'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...

Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 3, 2024, 05:27 PM IST
'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो... title=
Sourav Ganguly, India vs England, turning tracks

Sourav Ganguly on IND vs ENG : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा खुर्दा उडवला. 6 विकेट्स घेत सर्वाधिक जलद 150 विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून बुमराहने नवा विक्रम रचलाय. अशातच आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने बीसीसीआयला (BCCI) मोलाचा सल्ला दिला आहे. आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय. टर्निंग पीचवर खेळून फलंदाजीचा दर्जा नष्ट होत असल्याची खंत देखील गांगुलीने बोलून दाखवली.

नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली?

जेव्हा मी बुमराह-शमी-सिराज-मुकेशला गोलंदाजी करताना पाहतो. मला आश्चर्य वाटतं की, आम्हाला भारतात टर्निंग ट्रॅक तयार करण्याची गरज का आहे? चांगल्या विकेटवर खेळण्याचा माझा विश्वास प्रत्येक सामन्यात दृढ होत चालला आहे. अश्विन-जडेजा-कुलदीप आणि अक्षरसह ते कोणत्याही खेळपट्टीवर 20 विकेट मिळवतील. गेल्या 6 ते 7 वर्षात घरच्या मैदानावर खेळपट्ट्यांमुळे फलंदाजीची गुणवत्ता घसरत आहे. चांगल्या विकेट्स आवश्यक आहे, असं सौरव गांगुली याने म्हटलं आहे. तसेच भारत अजूनही 5 दिवस टेस्ट सामना जिंकेल, असा विश्वास देखील सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने धारदार गोलंदाजी करत इंग्लंडला गुडघ्यावर टेकवलं. मात्र, दुसऱ्या बाजूने मुकेश कुमार याला गुड लेंथ बॉलवर देखील मार खावा लागला. तर इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने टप्प्यात गोलंदाजी करत महत्त्वाच्या तीन विकेट्स काढल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला भारताचा डोंगर रोखण्यात यश आलंय. मात्र, सौरव गांगुलीने मांडलेल्या मुद्द्यावर सध्या जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.