Team India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता

Kapil Dev on Hardik Pandya:  सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.

Updated: Jun 29, 2023, 05:49 PM IST
Team India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता title=
Kapil Dev On Team Indias Fitness

Kapil Dev On Team Indias Fitness: भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण म्हणजे 1983 चा वर्ल्ड कप. कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वांच्या नाकावर टिच्चून वर्ल्ड कप भारतात आणला होता. या घटनेला आता 40 वर्ष पूर्ण झाले. 2011 मध्ये भारताने 28 वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. आता पुन्हा एकदा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा टीम इंडिया (Team India) जिंकणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता भारताचे अनेक खेळाडू अनफिट असल्याचं दिसून येतंय. त्यावर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले कपिल देव?

दुखापती हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. मला आशा आहे की परिस्थिती सुधारेल. मला नेहमीच हार्दिक पांड्याबद्दल काळजी वाटते. तो खूप लवकर जखमी होतो, असं म्हणत कपिल देव (Kapil Dev is concerned about Hardik Pandyas fitness) यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे प्रमुख खेळाडू जखमी असल्याने कॅप्टन रोहितचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेला अजून दोन महिने बाकी आहेत. त्याआधी हे खेळाडू फिट होणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला तर टीम इंडियाची दोन्ही बाजू खिळखिळी होण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - 'मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा...'; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा; पाहा Video

श्रेयस अय्यर टीममधून आऊट झाला आहे. तर के.एल राहुल फिट होण्याच्या मार्गावर आहे. तो आशिया कप खेळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची वर्णी लागू शकते. सध्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. ट्रेनिंग सेशनमध्ये तो दिवसाला 7 ओव्हर पूर्ण करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आगामी वर्ल्ड कपमध्ये यॉर्कर किंगची ताकद दिसणार का? हे पाहवं लागणार आहे.

दरम्यान, तुमचा मुख्य संघ असला तरी दुसरा संघ असा हवा की ज्यामध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता असायला हवी. वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी तुमचं नशीब आणि योग्य आयोयन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंचं फिट राहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असं कपिल देव म्हणाले होते.