Lionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."

FIFA World Cup 2026: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 2026 च्या फिफा विश्वचषकात सहभागी होणार का? या प्रश्नाचे उत्तर म्हणतो...

Updated: Feb 4, 2023, 06:17 PM IST
Lionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..." title=
Lionel Messi

Messi on FIFA World Cup 2026: लहानपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न मेस्सीने (Lionel Messi) गेल्या वर्षी कतार येथे अर्जेंटिनाला वर्ल्ड कपची (FIFA World Cup 2022) ट्रॉफी जिंकून पूर्ण केलं. एका हातात विश्वचषक उंचावण्याचं मोठं स्वप्न त्याने वयाच्या 35 व्या वर्षी पूर्ण केलं.  स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी गोल्डन बॉलचा (Golden Ball) चषक जिंकून त्याने स्पर्धावर नाव कोरलंय. या वर्ल्ड कपमध्ये त्याने सात गोल केले होते. त्यामुळे मेस्सीवर संपूर्ण जगावर कौतुकाचा वर्षाव केलाय. हा वर्ल्ड कप मेस्सीसाठी शेवटचा वर्ल्ड कप होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (Will Lionel Messi play in FIFA World Cup 2026  for Argentina Messi statment latest marathi sports news)

पुढील विश्वचषक (FIFA World Cup 2026) मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेत होणार आहे, तोपर्यंत त्याचं वय 39 वर्षे असेल. त्यामुळे आता तो आगामी वर्ल्ड कपमध्ये (Will Messi play in FIFA World Cup 2026) खेळणार की नाही?, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर आता थेट मेस्सीने भाष्य केलंय.

काय म्हणाला Lionel Messi ?

मला फुटबॉल (Football) खेळायला आवडते. मी तंदुरुस्त आहे आणि खेळाचा आनंद घेत आहे पण वर्ल्ड कप अजून दूर आहे. तोपर्यंत काय होते ते पाहावे लागेल, असं मेस्सी (Messi on FIFA World Cup 2026) म्हणाला आहे. सध्या माझं लक्ष्य पुढील वर्षीचे कोपा अमेरिका विजेतेपद राखण्याचं आहे, असंही तो यावेळी म्हणालाय.

आणखी वाचा - Lionel Messi ने जग जिंकलं पण... स्वत:च्या मुलाबरोबर असं का वागला? Video होतोय व्हायरल

दरम्यान, 39 व्या वयात दुसरा विश्वचषक (FIFA World Cup 2026) खेळणे कठीण असल्याचं देखील मेस्सीने यावेळी सांगितलं आहे. 18 डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) पाहिलेलं इतक्या वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. या दिवशी त्याच्या हातात फुटबॉलचा वर्ल्डकप होता. त्यामुळे आता मेस्सीने पुन्हा अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप खेळावा, असं  त्याचे चाहते अपेक्षा करत असल्याचं पहायला मिळतंय.