World Cup 1983 | एकानंतर एक आऊट, किरमानींचा तो कानमंत्र, सहाव्या नंबरवर उतरुन Kapil Dev ने इतिहास रचला

टीम इंडियाने (Team India) 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप (World Cup 1983) जिंकण्याचा कारनामा केला. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या '83' हा (83 Film) सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.    

Updated: Dec 23, 2021, 06:09 PM IST
World Cup 1983 | एकानंतर एक आऊट, किरमानींचा तो कानमंत्र, सहाव्या नंबरवर उतरुन Kapil Dev ने इतिहास रचला title=
छाया सौजन्य : आयसीसी

मुंबई : टीम इंडियाने (Team India) 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप (World Cup 1983) जिंकण्याचा कारनामा केला. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेल्या '83' हा (83 Film) सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या माध्यमातून ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. या 1983 च्या वर्ल्ड कपमधील एका सामन्याचा किस्सा आपण जाणून घेणार आहोत. (World Cup 1983  Flashback syed kirmani and kapil dev conversation during zimbabwe match kapil dev scored 175 runs innings)  

टीम इंडियाला या वर्ल्ड कपमध्ये अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला होता. झिंबाब्वे विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशाजनक कामगिरी केली होती. मात्र कॅप्टन कपिल देव यांच्या 175 धावांच्या (Kapil Dev 175 Runs Innings) खेळीने टीम इंडियाला तारलं होतं. 

तेव्हा कपिल देव (Kapil Dev) यांच्या सोबत सय्यद किरमानी (Syed Kirmani) मैदानात होते. त्यावेळेस मैदानात नक्की काय झालं होतं, किरमानी-देव यांच्यात काय बोलणं झालं होतं, हा किस्सा स्वत: किरमानींनी सांगितला आहे. 

हा किस्स्या जाणून घेण्याआधी त्या सामन्यात टीम इंडियाची स्थिती काय झाली होती, हे आपण समजून घेऊयात मग पुढे जाऊयात. 

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. 

टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली होती. कपिल देव अंघोळ करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना काय माहित होतं की आपल्याला काही मिनिटात मैदानात उतरावं लागणार आहे. 

टीम इंडियाच्या ओपनिंग आणि मीडल ऑर्डरच्या बॅट्समननी सपशेल निराशा केली. पहिल्या 5 फलंदाजांपैकी 2 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. 

सुनील गावसकर आणि क्रिष्णमचारी श्रीकांत ही ओपनर जोडी सुपर फ्लॉप ठरली. हे दोघेही डक आऊट झाले. एका मागोमाग एक विकेट जात होते. "कॅप्स 2 विकेट्स गेलेत", अशा शब्दात कपिल देव यांना कल्पना देण्यात आली. यावर "मला अंघोळ करु देत" असं उत्तर कपिल देव यांनी आतील बाजूने दिले. 

त्यानंतर मोहिंदर अमरनाथ 5, संदीप पाटील 1 आणि यशपाल शर्मा 9 धावा करुन तंबूत परतले. त्यामुळे टीम इंडियाची 5 बाद 17 अशी नाजूक स्थिती झाली. 

यानंतर टीम इंडिया पूर्ण 60 ओव्हरही पूर्ण खेळून काढणार की नाही, असा प्रश्न विचारला जात होता. हो, तेव्हा 60 ओव्हरचे सामने खेळले जायचे.

आता वळुयात सय्यद किरमानी यांनी सांगितलेल्या किस्स्याकडे. 

किरमानी यांनी सांगितलेला किस्सा जसाच्या तसा.....

"मी कपिल जवळ गेलो. तो शर्मेने मान खाली घालून उभा होता. ही 60 ओव्हरची मॅच होती. आपल्याला आणखी 35 ओव्हर खेळून काढायच्या आहेत. कॅप्स ऐक, तु टीममधील फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहेस. मी एक एक रन काढून तुला स्ट्राईक देतो. तु प्रत्येक बॉलवर हिट मारण्याचा प्रयत्न कर. आपल्यासाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. आपल्याला समोरच्याला मारुन मरायचं आहे. मी कपिलला धीर देत प्रेरणा दिली. त्यावर किरी भाई (कपिल देव यांचं टोपण नाव) आपल्याला आणखी 35 ओव्हर्स खेळायचं आहे, मी चांगलं खेळायचं प्रयत्न करेन, असं उत्तर कपिल देव यांनी किरमानींनी दिलं, असा हा किस्सा  किरमानांनी सांगितला. याबाबतचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने किरमानी यांच्या हवाल्याने दिलं आहे.  

किरमानी यांनी दिलेल्या प्रेरणेनंतर कपिल देव यांनी जे काही केलं, त्याची इतिहासात नोंद झाली. 

या 175 धावांच्या खेळीदरम्यान कपिल देव यांना टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली साथ दिली. कपिल देव यांनी फलंदाजांना हाताशी घेऊन छोटेखानी पण महत्त्वाची भागीदारी केली. 
 
कपिल देव आणि रॉजर बिन्नी या जोडीने 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. मात्र यानंतर रॉजर 22 धावा करुन माघारी परतला. रवी शास्त्रींनी 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. 

यानंतर मदन लाल यांच्यासोबत कपिल देव यांनी 62 धावा जोडल्या. मदल लाल 17 धावांवर बाद झाले. टीम इंडियाचा स्कोअर 140-8 असा होता. 

नवव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी

यानंतर 10 व्या क्रमांकावर सय्यद किरमानी मैदानात आले. सय्यद किरमानी यांनी कपिल देव यांना अखेरपर्यंत साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 126 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी निर्णायक क्षणी केलल्या भागीदारीमुळे हा सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला. 

किरमानी यांनी 56 चेंडूत  2 फोरसह नाबाद 24 धावा केल्या. कपिल देव यांनी 138 चेंडूत 16 खणखणीत फोर आणि 6 कचकचीत सिक्सच्या मदतीने नाबाद 175 धावांची खेळी केली होती.

देव यांनी केलेल्या धमाकेदार खेळीमुळे टीम इंडियाने 5 बाद 17 अशा नाजूक स्थितीवरुन निर्धारित 60 ओव्हरमध्ये 266 धावांपर्यंत मजल मारली. झिंबाब्वेला 267 धावांचे आव्हान मिळाले.

आता वेळ होती टीम इंडियाच्या गोलंदाजांची. गोलंदाजांही अपेक्षेवर खरे उतरले.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या झिंबाब्वेने सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने झिंबाब्वेला धक्के द्यायला सुरुवात केली. 

झिंबाब्वेच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना त्या आकड्याचं मोठ्या खेळीत रुपांत करण्यापासून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी रोखलं. 

टीम इंडियाकडून मदन लाल यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रॉजर बिन्नी यांनी दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कपिल देव, बलविंदर संधू आणि मोहिंदर अमरनाथ या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 57 ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला 235 धावांवर ऑल आऊट केलं. अशाप्रकारे टीम इंडियाने या अशक्य वाटणाऱ्या सामन्यात झिंबाब्वेवर 31 धावांनी विजय मिळवला.