World Cup 2019 : एक मॅच, ३ विकेट आणि ४ कॅच, इंग्लंडच्या खेळाडूचा विक्रम

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

Updated: Jun 3, 2019, 08:19 PM IST
World Cup 2019 : एक मॅच, ३ विकेट आणि ४ कॅच, इंग्लंडच्या खेळाडूचा विक्रम title=

नॉटिंगहम : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडच्या क्रिस वोक्सने विक्रमाला गवसणी घातली आहे. वोक्सने पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये ३ विकेट घेतल्या. याचबरोबर त्याने ४ कॅचही पकडले. ४४ वर्षांच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात ४ कॅच आणि विकेट घेणारा वोक्स पहिला खेळाडू ठरला आहे. याचसोबत २०१९ वर्ल्ड कपच्या एका मॅचमध्ये ४ कॅच पकडणारा वोक्स पहिला खेळाडू आहे.

३० वर्षांच्या क्रिस वोक्सचा हा दुसरा वर्ल्ड कप आहे. मागच्या वर्ल्ड कपमध्ये वोक्सने ५ मॅच खेळल्या होत्या, यामध्ये त्याला एकच कॅच पकडता आला होता. पण यावेळी दुसऱ्याच मॅचमध्ये वोक्सने ४ कॅच पकडले. वोक्सने या मॅचमध्ये इमाम उल हक, बाबर आजम, मोहम्मद हाफिज आणि सरफराज अहमद यांचे कॅच पकडले. सरफराजचा कॅच वोक्सने आपल्याच बॉलिंगवर घेतला. वोक्सने ८ ओव्हरमध्ये ७१ रन देऊन ३ विकेट घेतल्या.

वर्ल्ड कपच्या इतिहासात एका मॅचमध्ये ४ कॅच पकडणारा वोक्स चौथा क्रिकेटपटू आहे. पहिल्यांदा भारताच्या मोहम्मद कैफने २००३ वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध हे रेकॉर्ड केलं होतं. यानंतर २०१५ वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या सौम्य सरकार आणि पाकिस्तानच्या उमर अकमलने ४-४ कॅच पकडले होते. सौम्य सरकारने स्कॉटलंडविरुद्ध आणि उमर अकमलने आयर्लंडविरुद्ध हे रेकॉर्ड केलं होतं.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचं रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने ४६ मॅचमध्ये २८ कॅच घेतले आहेत. सनथ जयसूर्याने ३८ मॅचमध्ये १८ कॅच घेतले आहेत. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक कॅच घेणाऱ्या भारतीय अनिल कुंबळे आहे. कुंबळेने १८ मॅचमध्ये १४ कॅच पकडले आहेत.