त्यासाठी कोणीच तयार होणार नाही; Ind v SA मॅचच्या Playing XI बद्दल अक्रमचं भाकित

World Cup 2023 IND vs SA Probable Indian Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना 302 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Updated: Nov 4, 2023, 01:10 PM IST
त्यासाठी कोणीच तयार होणार नाही; Ind v SA मॅचच्या Playing XI बद्दल अक्रमचं भाकित title=
भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याआधी व्यक्त केलं मत

World Cup 2023 IND vs SA Probable Indian Playing XI: भारतीय संघाने 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक 302 धावांनी विजय मिळवून सेमीफायनल्समधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारताने वर्ल्ड कप 2023 च्या पर्वामध्ये आपले पहिले सातही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघही यंदाच्या पर्वात उत्तम कागिरी करत असून हे दोन्ही संघ उद्या म्हणजेच रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. हा सामना फायनल आधीची फायनल म्हणून चर्चेत असून ग्रुप स्टेजमधील दादा संघ कोणता हे या सामन्यातून निश्चित होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दमदार विजय मिळवणारा संघ बदलणार का हा प्रश्न आहे. याच प्रश्नावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

कोणी तयार होणार नाही

"कोलकात्यामधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना साथ देणारी आहे. मात्र मला असं वाटत नाही की भारतीय संघ काही खेळाडूंच्या निवडीमध्ये बदल करुन मैदानात उतरेल," असं अक्रम म्हणाला आहे. 'ए स्पोर्ट्स'शी बोलताना वसिम अक्रमने, "तुमचे सर्व गोलंदाज उत्तम गोलंदाजी करत आहेत. सध्या प्रकृतीसंदर्भातही कोणाला काही तक्रार नाही. भारतीय संघामध्ये बदल करण्याची नाही तर आराम देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. मात्र मी नियमितपणे चांगली गोलंदाजी करत असेल तर मी का आराम करावा? मी सलग 7 ते 8 महिने खेळत असेल तर गोष्ट वेगळी आहे," असं म्हणत कोणीही स्वत:हून आराम करण्यास तयार होणार नाही असं सूचित केलं आहे.

नक्की वाचा >> 'दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकला नाही तर...', डिव्हिलियर्सचं मत; भारतालाही दिला इशारा

भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव

"मात्र तुम्हाला हे समजायला हवं की ही वर्ल्ड कपची स्पर्धा आहे. तुमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ वाटत आहात. तुम्ही एकही सामना हरलेला नाहीत. संघामध्ये काहीही गोंधळ असल्याचं दिसत नाही. कोणतीही चूक होत नसून बॅटिंग फिल्डींग आणि बॉलिंगमध्ये भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. कर्णधारही उत्तम पद्धतीने नेतृत्व करत आहे. भारतीय संघाने प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे," असं अक्रम पुढे भारतीय संघाचं कौतुक करतना म्हणाला.

नक्की वाचा >> द्रविडला मिळाली दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठीची Tip; टीम इंडिया हॉटेलमध्ये असतानाच...

जास्तीत जास्त सूर्याला बाहेर बसवता येईल

दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खाननेही आपलं म्हणणं मांडताना, "भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. कोणत्याही खेळाडूला प्रकृतीची काही समस्या नाही. भारतीय संघाकडे उत्तम पर्याय आहेत. आता जे खेळाडू तंदरुस्त आहेत ते पुढच्या सामन्यात खेळतील. बदल करायचा झाला तर तुम्ही जास्तीत जास्त सूर्यकुमारला बाहेर पसवू शकता," असं म्हटलं आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांना पटापट विकेट्स मिळत असल्याने एकप्रकारे त्यांचा अधिक आराम होतोय, असं सांगताना मोईन अलीने भारतीय संघात फार बदल होणार नाहीत असं म्हटलं आहे. मात्र वर्कलोडचं कारण देत म्हणजे विश्रांतीचं कारण देत संघात बदल होऊ शकतात, हे नाकारता येत नाही असंही त्याने म्हटलं आहे.