World Cup : पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार? पाहा कसं आहे समीकरण

How many wins India need to Qualify for World Cup 2023 Semi-Finals: वर्ल्डकप स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( World Cup Points Table ) टीम इंडिया 6 पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. टीमचं रनरेटही +1.821 इतकं आहे. त्यामुळे आता सेमीफायनल ( World Cup 2023 Semi-Finals ) गाठण्यासाठी टीम इंडियाला ( Team India ) किती सामने जिंकावे लागतील शिवाय त्याचं गणित कसं असणार आहे, हे पाहूयात. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 16, 2023, 07:03 AM IST
World Cup : पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार? पाहा कसं आहे समीकरण title=

How many wins India need to Qualify for World Cup 2023 Semi-Finals: आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्तम सुरु आहे. टीम इंडियाने ( Team India ) या स्पर्धेत सलग 3 सामने जिंकले आहे. शनिवारी झालेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 7 विकेट्सने विजय मिळवला. यामुळे वर्ल्डकप स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( World Cup Points Table ) टीम इंडिया 6 पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे. टीमचं रनरेटही +1.821 इतकं आहे. त्यामुळे आता सेमीफायनल ( World Cup 2023 Semi-Finals ) गाठण्यासाठी टीम इंडियाला ( Team India ) किती सामने जिंकावे लागतील शिवाय त्याचं गणित कसं असणार आहे, हे पाहूयात. 

दहा टीम्स असलेल्या या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये सर्व टीमना एकदा एकमेकांशी भिडावं लागणार आहे. त्यानंतर पॉईंट्सच्या अव्वल स्थानी असलेल्या चार टीम्स उपांत्य फेरीत प्रवेश करतील. यामध्ये जर भारताला उपांत्य ( World Cup 2023 Semi-Finals ) फेरीतील आपलं स्थान पक्कं करायचं असेल तर त्याला 9 पैकी 7 सामने जिंकावे लागतील. 

सध्याच्या परिस्थितीत टीम इंडियाने ( Team India ) 3 सामने खेळले असून या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आता उरलेल्या 6 सामन्यांमध्ये कोणतीही अडचण न येता सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करायचं असेल तर टीम इंडियाला ( Team India ) अजून केवळ 4 सामने जिंकावे लागणार आहेत. 

पेचात फसू शकते का टीम इंडिया?

गेल्या काही वर्ल्डकपच्या स्पर्धांमध्ये असं पहायला मिळालंय की, अनेकदा नेट रनरेटच्या मुद्द्यांवरून पेच निर्माण होतो. वर्ल्डकप 2019 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड ( Pak VS Nz ) या दोन्ही टीमने शेवटी प्रत्येकी 11 पॉईंट्स होते. यावेळी दोन्ही टीम्सचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण वाटून देण्यात आला. पण नेट रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड पुढे होती. त्यामुळे केवळ 5 सामने जिंकून देखील न्यूझीलंडच्या टीमला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला होता.

नेट रनरेटवरही भर देणं गरजेचं

समजा टीम इंडियाला ( Team India ) 7 सामने जिंकणं शक्य झालं नाही, तर अशा परिस्थितीत नेट रन रेटवर उत्तम ठेवणं हा एक पर्याय असू शकतो. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये टीम इंडियाला नेट रनरेटवरही भर द्यावा लागणार आहे.