इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, क्वारंटाइन कालावधीत बदल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. 

Updated: May 22, 2021, 11:27 AM IST
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, क्वारंटाइन कालावधीत बदल title=

मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया हा सामना इंग्लंडमधील साउथेप्टम मैदानात होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या सामन्यानंतर इंग्लंड विरुद्ध 4 ऑगस्टपासून सीरिज देखील खेळवली जाणार आहे.

क्वारंटाइन कालावधीमध्ये बदल

इंग्लंड दौऱ्याआधीच टीम इंडियासाठी आणखी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. सध्या सर्व खेळाडू मुंबईत क्वारंटाइन आहेत. त्यानंतर इंग्लंडमध्ये देखील त्यांना 10 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार होतं. मात्र आता हा नियम बदलण्यात आला असून केवळ इंग्लंडमध्ये 3 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे.

45 वर्षांच्या फलंदाजाने रचला इतिहास! 30 बॉलमध्ये 150 धावा करण्याचा विक्रम

विराटसेनेल 7 दिवस सराव करण्यासाठी मिळणार आहे. तीन दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर मैदानात टीम इंडिया आपला सराव करू शकणार आहे. ही टीम इंडियासाठी जमेची बाजू असणार आहे. सध्या टीम इंडियाचे सर्व खेळाडू मुंबईमध्ये क्वारंटाइन आहेत. 

क्वारंटाइन कालावधी बदलण्यामागे हे कारण

इंग्लंड दौर्‍यावर न्यूझीलंड विरुद्ध 18 जूनपासून WTC अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडकडून 5 कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळणार आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.

WTCच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याने इंग्लंडकडून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळून आपल्या तयारीचीही चाचणी घेतली असती. अशा परिस्थितीत टीम इंडिया 2 जूनला तिथे पोहोचला असता आहे. जर 10 दिवस क्वारंटाइनसाठी दिला असता तर तयारीसाठी जास्त वेळ मिळाला नसता. हेच कारण आहे की त्यामुळे BCCIने इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डकडून हा कालावधी कमी करण्यासाठी विनंती केली.