Wriddhiman Saha : लाईव्ह सामन्यात उलटी पँट घालून मैदानात उतरला साहा, व्हिडीओ व्हायरल

Wriddhiman Saha :  वृद्धीमान सहाने लखनऊ विरूद्धच्या सामन्यात चांगली खेळी केली. मात्र फिल्डींगला मैदानात उतरल्यावर त्याच्याकडून एक गमतीशीर चूक घडली.

सुरभि जगदीश | Updated: May 7, 2023, 11:46 PM IST
Wriddhiman Saha : लाईव्ह सामन्यात उलटी पँट घालून मैदानात उतरला साहा, व्हिडीओ व्हायरल title=

Wriddhiman Saha : अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ( Narendra Modi Stadium ) आज लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात सामना यांच्यामध्ये सामना रंगला. दरम्यान आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा ( Gujarat Titans ) ओपनर वृद्धिमान सहाने ( Wriddhiman Saha ) उत्तम फलंदाजी केली. मात्र फिल्डींगला उतरतेवेळी वृद्धीमान सहाकडून ( Wriddhiman Saha )  झालेली एक गंमतीशीर चूक मात्र मैदानावर असलेल्या प्रत्येक खेळाडूच्या लक्षात राहण्यासारखी आहे. साहाकडून झालेल्या या चुकीची तिथे उपस्थित प्रत्येकाने मजा घेतली.  

सहाकडून झाली गमतीशीर चूक

लखनऊने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी गुजरातची ( Gujarat Titans ) टीम फलंजादीनंतर जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी उतरली त्यावेळी साहाकडून  ( Wriddhiman Saha ) एक चुक झाली. दरम्यान मैदानावर उतरल्यानंतर साहाला आपली चूक लक्षात आली. 

सहाकडून काय झाली चूक?

आजच्या सामन्यात फिल्डींगला उतरताना वृद्धिमान सहा उलटी पँट घालून मैदानात उतरला ( Wriddhiman Saha Wearing Trousers Backwards ) होता. सहाची ही गमतीशीर चूक जेव्हा हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमीच्या लक्षात आली, त्यावेळी दोघंही जोरजोरता हसू लागले. ही घटना इतकी गमतीशीर झाली की, फलंदाजीला आलेला क्विंटन डी कॉक देखील स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही. यानंतर साहा पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि पँट सरळ करून पुन्हा मैदानावर आला. 

साहाची तुफान खेळी

आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans ) प्रथम फलंदाजी करत लखनऊसाठी ( Lucknow Super Giants ) मोठा स्कोर उभा केला. गुजरातने 20 ओव्हर्समध्ये 227 रन्स केले. यावेळी गुजरातकडून वृद्धिमान साहाने ( Wriddhiman Saha ) 81 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. 

शुभमन गिलचं शतक चुकलं

गुजरात टायटन्सच्या दोन्ही ओपनर्सने आज टीमला चांगली सुरुवात करून दिली. शुभमन गिल ( Shubman Gill ) देखील आज मोठे शॉट खेळत होता. शुभमनने आजच्या सामन्यात 94 रन्सची नाबाद खेळी केली. यावेळी त्याने 2 फोर तर 7 उत्तुंग सिक्स लगावले. मात्र 20 ओव्हर्स पूर्ण झाल्यामुळे शुभमनला ( Shubman Gill ) त्याचं शतक पूर्ण करता आलं नाही.