SRH vs MI: होय, चूक झालीये...; सलग दुसऱ्या पराभवानंतर Rohit Sharma चं नाव घेत काय म्हणाला हार्दिक?

IPL 2024 SRH vs MI: हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव करत यंदाच्या सिझनमधील पहिला विजय मिळवला आहे. यावेळी पंड्याने चुकांमधून सुधारणार असल्याचं सांगितलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 28, 2024, 07:09 AM IST
SRH vs MI: होय, चूक झालीये...; सलग दुसऱ्या पराभवानंतर Rohit Sharma चं नाव घेत काय म्हणाला हार्दिक? title=

IPL 2024 SRH vs MI: बुधवारी हैदराबादच्या मैदानावर रन्सचा जणू पाऊस पडला. रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. यावेळी हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना 277 रन्सचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वाधिक स्कोर होता. याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने देखील खेळ करत 246 रन्सची खेळी केली. अखेरीस हैदराबादने मुंबई इंडियन्सचा पराभव करत यंदाच्या सिझनमधील पहिला विजय मिळवला आहे. यावेळी पंड्याने चुकांमधून सुधारणार असल्याचं सांगितलं आहे. 

सलग दुसऱ्या पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

यंदाच्या सिझनमध्ये झालेल्या सलग दुसऱ्या पराभवानानंतर पांड्याने प्रतिक्रिया दिली. पंड्या म्हणाला, “विकेट खूप चांगली होती. मुळात एवढी मोठी धावसंख्या समोरची टीम उभारेल असं मला वाटलं नव्हतं. मात्र, हैदराबादची फलंदाजीही चांगली होती. गोलंदाजी करताना आम्ही काही नवीन प्रयोग केले. आमचं गोलंदाजी आक्रमण खूपच तरुण आहे. आमच्याकडे मफाका आहे, तो खूप चांगला गोलंदाज आहे. आम्ही झालेल्या चुकांमधून शिकतो. आपल्याला फक्त थोडा बदल हवा आहे. या सामन्यात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. याचा अर्थ खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचं दिसून आलं. 

पंड्या पुढे म्हणाला की, आमच्या टीमने चांगली फलंदाजी केली. किशन, रोहित आणि तिलक यांनी त्यांचा उत्तम खेळ दाखवला. काही गोष्टी चुकल्या आहेत. जर आम्ही त्या योग्य केल्या तर सर्व काही ठीक होईल.

मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून 277 रन्स केले. यादरम्यान हेनरिक क्लासेनने 34 बॉल्समध्ये नाबाद 80 रन्स केले. क्लासेनने 7 सिक्स आणि 4 फोर लगावले. अभिषेक शर्माने 23 बॉल्समध्ये 63 रन्स केले. ट्रॅव्हिस हेडने 24 बॉल्स 62 रन्स केले. यावेळी हेडने 9 फोर आणि 3 सिक्स लगावले. 

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सची टीम केवळ 246 रन्सचं करू शकली. तिलक वर्माने 64 रन्सची खेळी केली. त्याने 34 बॉल्समध्ये 6 सिक्स आणि 2 फोर लगावले. टीम डेव्हिडने नाबाद 42 धावा केल्या. याशिवाय रोहित शर्मा आणि इशान किशनने जलद खेळी केली. यामुळे मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.