निवडणूक आयोग

जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?

आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2014, 05:42 PM IST

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

Oct 13, 2014, 09:32 PM IST

राज्यात जप्त केलेली रोकड १४ कोटीच्या पुढे

राज्यात मतं विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे, यात कोणत्याही एका पक्षावर आरोप करता येणार नाहीत. 

Oct 13, 2014, 07:15 PM IST

सोशल मीडियाच्या वापरावर निवडणूक आयोगाचं लक्ष

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राजकीय पक्षांप्रमाणे आता निवडणूक आयोगालाही या माध्यमाचं महत्त्व कळलंय.

Oct 9, 2014, 02:33 PM IST

गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

Oct 7, 2014, 07:07 AM IST

UPDATE: या 'बंडोबां'चे आज झाले 'थंडोबा'!

इच्छुक पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभरात सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागलाय. अनेक उमेदवारांनी बंडाचं शस्त्र उपसलंय. मात्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं बंडखोरांना शांत करण्याचा नेतेमंडळी चांगलाच प्रयत्न करतांना दिसतायेत. अनेक बंडोबांचा आता त्यामुळं थंडोबा झालाय. 

Oct 1, 2014, 04:22 PM IST

'आचारसंहिता' म्हणजे काय रे भाऊ?

नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होतं, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक आपल्या मनात असतात, पाहा काय आहेत ही उत्तरं?

Sep 16, 2014, 06:00 PM IST

निवडणूक आयोग आज विधानसभेचं रणशिंग फुंकणार?

गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्याच्या तयारीत असतांना, निवडणूक आयोग आज महाराष्ट्र विधानसभेसाठी रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा आहे. कारण निवडणूक आयोगाने उद्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

Sep 8, 2014, 07:50 PM IST

पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना दणका

पेड न्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना निव़डणूक आयोगाने दणका दिलाय.

Jul 13, 2014, 06:49 PM IST

राष्ट्रवादीची ‘टिकटिक’ केवळ महाराष्ट्रातच वाजणार!

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या घड्याळाची टिकटिक केवळ राज्यापूरतीच राहू शकते.

Jun 30, 2014, 02:09 PM IST

यंदाची निवडणूक सर्वात महागडी, ३३४२६ कोटी खर्च!

लोकसभा निवडणूक म्हणजे कोट्यवधींची उधळण हे पुन्हा दिसून आलंय. यंदाची निवडणूक तर सर्वांत महागडी ठरली आहे. निवडणुकीसाठी सरकारनं ३४२६ कोटी रुपये खर्च केले, तर विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून ३० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळं एकत्रित ३३,४२६ कोटी रुपयांचा चुराडा या निवडणुकीत झाला आहे.

May 14, 2014, 10:07 AM IST

राहुल गांधींना निवडणूक आयोगाची क्लिन चिट

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना निवडणूक आयोगाने क्लिन चिट दिलीय. अमेठीमध्ये 7 मे रोजी मतदानाच्या वेळी राहुल गांधींनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या भागात प्रवेश करून, मतदान गोपनीयतेचा भंग केल्याची तक्रार भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती.

May 10, 2014, 08:07 PM IST

राहुल गांधी हाजीर होऽऽ! बूथ कॅप्चरिंग भोवलं!

अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय.

May 10, 2014, 11:48 AM IST