मुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री

मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.

पवार म्हणतात, आबा आमचे गुणाचे...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांची पाठराखण केली आहे. आर.आर.पाटील एक उत्तम गृहमंत्री म्हणून काम करित आहेत.

`अमर जवान` स्मारकाचे नुकसान, तरूण जेरबंद

मुंबईतील हिंसाचारावेळी `अमर जवान` स्मारकाचे नुकसान करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. या तरूणाची सीसीटीव्ही फुटेज आणि माध्यमांनी केलेल्या चित्रीकरणानंतर ओळख पटली आहे.

मुंबईतील हिंसाचार पूर्वनियोजित - पोलीस

मुंबईत ११ ऑगस्ट रोजी करण्यात आलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, असं आता पोलिसांनी म्हटलं आहे. हिंसाचाराचे हे षड्यंत्र कसे रचले गेले, याची माहिती पोलीस काढत आहेत.

मुंबईतील हल्लेखोरांना पकडा, पाच लाख मिळवा

मुंबईत १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘अमर जवान’ क्रांतिस्तंभावर हल्ला करणाऱ्या धर्मांध आंदोलकांची पोलिसांना माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.

xxx अबू आझमी निवडून येतोच कसा? - राज

भाषणामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा खास ‘ठाकरी’ शैलीत लोकांसमोर मांडला. अर्थातच टार्गेट होतं... अबू आझमी.

मोर्चा काढणारच; मनसे व्यूहरचनेत दंग

गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे मंगळवारी म्हणजेच उद्या मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसे विशेष व्युहरचना करण्यात व्यस्त आहे.

`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`

राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.

मुंबई हिंसाचारप्रकरणी सलीम चौकियाला अटक

आझाद मैदानातल्या हिंसाचारप्रकरणी मुंबई पोलिसांनी सलीम चौकिया याला अटक केलीय. आशिवरा भागातल्या आनंद नगरमधील रहिवासी असलेल्या सलीम चौकियाला पोलिसांकडून एसएलआर हिसकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सोशल नेटवर्किंगचा हिंसेसाठी वापर!

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून भावना भडकवून मुंबईत ‘सीएसटी’वर हिंसाचार घडवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय.

संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार

मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला.

ठाकरे बंधूंनी घेतलं गृहमंत्र्यांना फैलावर

सीएसटी हिंसाचाराच्या मुद्यावरुन आता ठाकरे बंधूंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.. उद्धव आणि राज ठाकरे यांनी गृहखातं आणि सरकारवर सडकून टीका केलीय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही गृहखात्याचा कारभार टफ मंत्र्यांच्या हातात देण्याची मागणी राज्यपालांकडे केलीय.

पोलिसांना मिळाली होती हिंसेची सूचना

मुंबई हिंसाचाराबद्दल आता एक धक्कादायक माहिती पुढे येतेय. आसाम मुद्यावरून मुंबईच्या कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची सूचना अगोदरच मिळाली होती.