युपीए

'केंद्रातील यूपीए सरकार हे शरद पवारांमुळेच!'

राष्ट्रवादीनं मिशन 2014ची तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी हाच राज्यातील एक नंबरचा पक्ष असून पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा हव्या असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केलय.

Oct 20, 2012, 12:47 PM IST

युपीएविरोधात ममतादीदी आक्रमक

एफडीआयच्या मुद्यावरून केंद्र सरकार अडचणीत आलं आहे. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची घोषणा तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलीय.

Oct 1, 2012, 04:15 PM IST

युपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!

`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Sep 29, 2012, 01:10 PM IST

भारत बंद : कोणाचा सहभाग, कोणाचा नाही?

एफडीआय आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये युपीएचे काही घटकपक्षही सहभागी झाल्यामुळे विरोधकांना हुरूप आला आहे. मात्र, भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने केला आहे. तर राष्ट्रवादी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंदत सहभागी होणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मुंबईत भारत बंदला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तर पुण्यातील भाजप संपात उतरलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Sep 20, 2012, 08:53 AM IST

ममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान

तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ममताना आर्थिक सुधारणांचे मोठे निर्णय घेण्यापूर्वी कल्पना दिली होती, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Sep 19, 2012, 12:32 PM IST

युपीएला धोका नाही- नीतिश कुमार

केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.

Sep 17, 2012, 04:12 PM IST

कोळसा घोटाळ्यात सरकारकडून दिशाभूल- जेटली

कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी भाजपनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोळसा वाटपात शुन्य तोटा झाल्याचा सरकारनं केलेला दावा हास्यास्पद असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी सरकारनं कोळसा खाणींचं वाटप केलं त्या दिवशीच सरकार तोट्यात गेलं असा दावा जेटलींनी केलाय.

Aug 25, 2012, 05:09 PM IST

युपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब

युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

Aug 11, 2012, 05:38 PM IST

मनोहर जोशींच्या वक्तव्यावर पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर जोशी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितलं, की राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या-वाईट काळात नेहमीच काँग्रेसला साथ देईल.

Aug 10, 2012, 03:15 PM IST

पवार म्हणतात 'वेळ' संपली, 'हाता'ची सोडणार साथ?

काँग्रेस-राष्ट्रवादीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसचं युपीला बाहेरुन पाठिंबा देण्याबाबतही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु आहेत.

Jul 23, 2012, 04:50 PM IST

...आणि शरद पवार नाराज झाले?

युपीएच्या कालच्या बैठकीला शरद पवार अनुपस्थित राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादी यूपीएवर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगतीय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठताक्रमात पवार यांना डावलून संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांना दुस-या क्रमांकाचं स्थान दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे.

Jul 15, 2012, 02:27 PM IST

...अशी झाली मुखर्जींच्या नावाची घोषणा

शुक्रवारचा दिवस दिल्ली दरबारी धावपळीचा ठरला. सकाळपासून ते प्रणव मुखर्जींची उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात…

Jun 16, 2012, 08:30 AM IST

ममतांची केंद्र सरकारवरची 'ममता' आटली

पेट्रोल दरवाढीच्या झळा केंद्र सरकारला बसायला सुरवात झाली आहे. गेल्या वर्षभरात ही पेट्रोलची नववी दरवाढ आहे. युपीएच्या घटक असलेल्या ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून देण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

Nov 4, 2011, 01:58 PM IST