शरद पवार

पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?

15 ऑगस्टच्या बैठकीतही तुपकर आले नाहीत, तर समिती निर्णय घेणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.  आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला रविकांत तूपकर यांनी दांडी मारली. 

Aug 8, 2023, 06:02 PM IST

'ना थका हूँ ना हारा हूँ'! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, 'या' मतदारसंघातून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.

Aug 5, 2023, 04:57 PM IST

राष्ट्रवादी पक्ष फुटला तरी शरद पवार आणि अजित पवार हे एकच? काका-पुतण्याच नेमकं चाललयं तरी काय?

साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत, अजित पवारांचा शिरूरमध्ये दावा. राजकीय भूमिका वेगळी असली तरी परिवार म्हणून एकत्र अजित पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण. 

Aug 1, 2023, 11:20 PM IST

पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं पाहा.

Aug 1, 2023, 10:09 PM IST

Raj Thackeray: 'सत्तेसाठी वाट्टेल ते...'; लोकमान्य टिळकांचा दाखला देत राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला!

Raj Thackeray Criticised Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा दाखला देत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

Aug 1, 2023, 12:42 PM IST

साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार

Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. 

Aug 1, 2023, 10:45 AM IST

शरद पवार जपानी बाहुलीसारखे; नितीन गडकरी यांचा मिश्किल टोला

शरद पवार जपानी बाहुलीसारखे दिसतात. प्रत्येकाला वाटतं साहेब आपल्याकडे बघतायत. गडकरींची कोपरखळी तर टीका करुन मैत्रीत दुरावा निर्माण करू नका, भुजबळांची प्रतिक्रिया.

Jul 31, 2023, 09:17 PM IST

मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम! महाविकास आघाडीमध्ये नाराजी, संजय राऊत म्हणाले...

पुण्यात मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यावर शरद पवार ठाम आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरलेय.  पवारांनी उपस्थिती लावल्यास संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य 
सजंय राऊतांनी केले आहे. 

Jul 31, 2023, 08:02 PM IST

मुंबईत 'इंडिया'ची बैठक; उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर मोठी जबाबदारी

लवकरच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांचा धडाका सुरू होणार आहे. मुंबईतील विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर सभांचं आयोजन केले जाणार आहे. 

Jul 28, 2023, 11:50 PM IST

मोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा 'दे धक्का' राष्ट्रवादीतले आणखी 7 आमदार अजित पवार गटात

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्याकडे 30 हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे. 

Jul 20, 2023, 06:05 PM IST

राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवारांची मनधरणी की अजित पवारांची रणनीती?

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडखोरांनी शरद पवारांची मनधरणी सुरूच ठेवलीय. लागोपाठ दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंडखोर मंत्री आणि आमदारांनी पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीतल्या या नाट्यमय घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. 

Jul 17, 2023, 08:46 PM IST

शरद पवार-अजित पवार भेट! राजकारणात दिसतं तसं नसतं; पडद्यामागून नेमकं काय घडतंय?

आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अशी भूमिका अजित पवार गटाच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडली आहे. मात्र, त्यांच्या या भेटीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. 

Jul 16, 2023, 11:44 PM IST

भाजपसोबत जाणार? शरद पवार यांनी भूमिका मांडली; अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी अपडेट

आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत आपल मत  मांडलं.  सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Jul 16, 2023, 05:56 PM IST

Maharashtra Political Crisis : नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु असतानाच आता नव्यानं मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

 

Jul 11, 2023, 07:41 AM IST

राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

Jul 10, 2023, 10:41 AM IST