बीडमध्ये फळं खाल्ल्याने चिमुकल्यांचा मृत्यू

बीडमध्ये फळं खाल्ल्याने चिमुकल्यांचा मृत्यू

चिकू, सफरचंद खाल्ल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या गोलांग्री गावात घडलीये.

सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन

सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन

सुरेश धस यांचे राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याने ही कारवाई करण्यात आले आहे.  

पक्षाचा पराभव दादांच्या जिव्हारी, गद्दारांना धडा शिकवणार

पक्षाचा पराभव दादांच्या जिव्हारी, गद्दारांना धडा शिकवणार

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेसनं गंभीर दखल घेतलीय. 

बीड जिल्हा परिषद विजयावर पंकजा मुंडे बोलल्या...

बीड जिल्हा परिषद विजयावर पंकजा मुंडे बोलल्या...

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेली लढाई ही बहीण विरुद्ध  भाऊ नव्हती तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते विरुद्ध आम्ही जिल्ह्यातल्या सगळे नवखे अशी होती. त्यामध्ये आपण जादूच्या कांडीचा वापर करून विजय मिळवला. यात आपल्याला सुरेश धस यांची मोठी मदत झाली अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. 

बीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत

बीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत

हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय. 

...त्या शहिदाच्या आई-पत्नीला अजूनही कल्पना नाही

...त्या शहिदाच्या आई-पत्नीला अजूनही कल्पना नाही

हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या गांजपूर इथल्या विकास समुद्रे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर या गावावर शोककळा पसरली.

बीडमध्ये राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार ?

बीडमध्ये राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार ?

मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला असून राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावातील लढत जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार हे नक्की.

मुलींच्या जन्माचा उत्सव... 166 मुलींचं एकाच वेळी बारसं!

मुलींच्या जन्माचा उत्सव... 166 मुलींचं एकाच वेळी बारसं!

बीडमध्ये झालेल्या एका सोहळ्यात तब्बल 166 मुलींचं बारसं करण्यात आलंय. 

धक्कादायक पण सत्य : सावित्रीच्या लेकींचे सर्रास बालविवाह सुरूच

धक्कादायक पण सत्य : सावित्रीच्या लेकींचे सर्रास बालविवाह सुरूच

सावित्री फुलेंची आज जयंती.... पण आजही सावित्रीच्या अनेक लेकींची दयनिय अवस्था आहे. 

भगवानगडावर पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

भगवानगडावर पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जोरदार शक्तीप्रदर्शऩ केलं. सुमारे पाऊण तास केलेल्या भाषणात आपले चुलतबंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.

बीडमध्ये पावसाची विश्रांती, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

बीडमध्ये पावसाची विश्रांती, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतलीय त्यामुळे पुराचा जोर कमी झाला आहे. बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या,गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळू हळू कमी झालं. त्यामुळे महापुराने गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान, या पावसाने पाटोदा,चौसाळा या भागातील पाच ते सहा गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अनेक ग्रामीण भागातील नदीनाल्यांच्या पाण्यात वाढ होतेय. शहरातल्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 

सौताडा धबधबा तब्बल वीस वर्षानंतर धो धो बरसू लागला

सौताडा धबधबा तब्बल वीस वर्षानंतर धो धो बरसू लागला

जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचे एकेकाळी आकर्षण असलेला सौताडा इथला धबधबा तब्बल वीस वर्षानंतर धो धो बरसू लागला आहे. 

बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीडमध्ये सेल्फी काढताना दोघे वाहून गेलेत

बीड जिल्ह्यातल्या बिंदुसरा धरणावर सेल्फी काढताना दोघे वाहून गेले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले.

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर

मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील नद्यांना पूर

मराठवाड्यात दमदार पाऊस झाला आहे. तर बीड जिल्ह्यात पावसानं सरासरीची मर्यादा ओलांडली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या १०० पॉईंट ३८ टक्के इतका पाऊस झाला आहे.

बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर

बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं नद्यांना पूर आलाय. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलंय. 

बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या

बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली.

बीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा

बीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा

जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात आज माजी संचालक पांडुरंग गाडे यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी...

सावकारचा निर्लज्जपणा, शेतकऱ्याकडे मुलगी-सुनेची मागणी...

 हडप केलेली जमीन मागायला शेतकरी गेल्यावर तुझी मुलगी आणि सून माझ्या घरी पाठव तरच तुझी जमीन देईल, अशी  तळ पायाची आग मस्तकात जाणारी मागणी सावकाराने केल्याची घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात असलेल्या कारी येथे घडली. 

सहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा

सहकार निवडणुकीत पंकजा ताईंची बाजी, धनंजय मुंडे पॅनलचा धुव्वा

मराठवाड्यातील अग्रगण्य अशा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत, मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवलाय. दहा हजारा मतांनी विजय मिळवलाय.