'राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत उत्तम' - संजय राऊत

'राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत उत्तम' - संजय राऊत

ष्ट्रपतीपदाच्या उमेदवारामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांना स्थान मिळावं, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

...तर स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल - राऊत

...तर स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल - राऊत

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलंय.

गरज आहे  तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत

गरज आहे तिथे शिवसेना हात उचलणार - संजय राऊत

 एअर इंडियाने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एअर इंडियाला धारेवर धरले आहे. 

'कुत्रंही सोबत नव्हतं तेव्हा भाजपसोबत शिवसेना उभी राहिली'

'कुत्रंही सोबत नव्हतं तेव्हा भाजपसोबत शिवसेना उभी राहिली'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आगपाखड केलीय. 

राममंदिरावरून राऊतांनी भाजपला डिवचले...

राममंदिरावरून राऊतांनी भाजपला डिवचले...

 उत्तर प्रदेशात भाजपा बहुमत मिळाले आहे, आता लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा शिवसेना खासदार  संजय राऊत व्यक्त केली आहे. राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत म्हणाले.

मुंबईत महापौर निवडीबाबत भाजपच्या भूमिकेबाबत संजय राऊत म्हणतात...

मुंबईत महापौर निवडीबाबत भाजपच्या भूमिकेबाबत संजय राऊत म्हणतात...

मुंबई महापालिकेमध्ये महापौर निवडीतून भाजपने माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्याची मध्यावतीच्या दिशेने वाटचाल - संजय राऊत

राज्याची मध्यावतीच्या दिशेने वाटचाल - संजय राऊत

 राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि राज्य मध्यावती निवडणुकीच्या दिशेने वाटचाल होत असे संकेत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासशी बोलताना दिले. 

'23 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार'

'23 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप होणार'

23 तारखेनंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपमध्ये सैन्यभरती प्रमाणे गुंडभरती - संजय राऊत

भाजपमध्ये सैन्यभरती प्रमाणे गुंडभरती - संजय राऊत

 पोलीस किंवा सैन्य भरती होते त्याप्रमाणे भाजपमध्ये गुंड भरती होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. अशा प्रकारे गुंडांची भरती होणं हे संघ विचारांच्या विरोधात आहे. म्हणून आरएसएसचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेवर मतप्रदर्शन करण्याआधी भाजपला उपदेश करावा, असा टोला संजय राऊत यांनी नागपुरात लगावला. 

'सामना'वर बंदीवर असं काही बोलले संजय राऊत

'सामना'वर बंदीवर असं काही बोलले संजय राऊत

 भाजप-शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय....शिवसेनेचे मुखपत्र सामनावर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केलीय. 

फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

फडणवीस सरकार नोटीस पीरियडवर, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

राज्यामध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास रोजच कुरबुरी सुरु आहेत.

'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'

'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'

मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.

मनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा

मनसेकडून युतीचा प्रस्तावच नाही - संजय राऊतांचा प्रतिदावा

शिवसेना-मनसे युती होणार नसल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी मनसेच्या युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून अजूनही शिवसेना-मनसेत वाद सुरू आहेत. 

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग औकात दाखवतो'

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग औकात दाखवतो'

औकातीची भाषा मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मग दाखवतो औकात असा पलटवार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. 

बाळासाहेबांचा संपत्तीचा वाद, संजय राऊतांची झाली साक्ष

बाळासाहेबांचा संपत्तीचा वाद, संजय राऊतांची झाली साक्ष

 बाळासाहेब संपत्ती वादा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सामना वृत्तपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांची आज साक्ष झाली. यावेळी स्वत: संजय राऊत यांनी उपस्थित राहून साक्ष दिली. 

राष्ट्रपतींच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेनेचे प्रयत्न?

राष्ट्रपतींच्या दुसऱ्या टर्मसाठी शिवसेनेचे प्रयत्न?

भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी टर्म मिळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला आहे.

शिवसेनेचा  उशीराचा माफीनामा !

शिवसेनेचा उशीराचा माफीनामा !

लाखोंच्या संख्येनं सुरू असलेले मराठा मोर्चे आताच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असले तरी शिवसेनेच्या विरोधात त्यांचा फारसा राग नव्हता आणि त्यामुळे इतरांना कुणाला तोटा झाला असता तरी शिवसेनेला काहीप्रमाणात का होईना फायदाच झाला असता.... मात्र 'सामना'मध्ये मराठा मोर्चाविषयी छापण्यात आलेल्या कार्टूनमुळे एकदम चित्रच पालटलं आणि शिवसेनेच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली...

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा

दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.

एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!

एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.

सामनाचे  संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी-शेलार

शिवसेनेचं मुखपत्र सामना या दैनिकातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्राबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी एका पत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.