ball tempering

Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा

cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news

Feb 10, 2023, 04:32 PM IST

video :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले. 

Mar 29, 2018, 02:41 PM IST

आयपीएलमध्ये नाही खेळणार स्मिथ आणि वॉर्नर

बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. 

Mar 28, 2018, 02:27 PM IST

बॉल टेंपरिंग : स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. 

Mar 28, 2018, 02:11 PM IST

ऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली

बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला. 

Mar 28, 2018, 12:10 PM IST

स्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.

Mar 27, 2018, 08:01 PM IST

बॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय

  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे. 

Mar 27, 2018, 07:17 PM IST

VIDEO : याआधीही कॅमेरुनने बॉलशी केली होती छेडछाड

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वादात अडकलेाल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि सलामीचा फलंदाजी कॅमेरुन बेनक्राफ्टच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

Mar 27, 2018, 03:54 PM IST

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आपातकालीन बैठक, खेळाडू आणि कोचबाबत आज निर्णय

द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय. 

Mar 27, 2018, 01:54 PM IST

बॉल टेंपरिंग प्रकरण, हरभजनची आयसीसीवर जोरदार टीका

बॉल टेंपरिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमेरन बेनक्राफ्टवर केवळ मॅच फीवर ७५ टक्के दंड आणि बंदी न घातल्याप्रकरणी भारताचा स्पिनर हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केलीये. हरभजनने यावेळी २००१मधील दक्षिण आफ्रिके टेस्टची आठवण करुन दिली. या कसोटीदरम्यान पाच भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास, दीपदास गुप्ता यांच्यावर मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी विविध आरोपांखाली कमीत कमी एका कसोटीवर बंदी घातली होती. 

Mar 26, 2018, 03:31 PM IST

स्टीव्ह स्मिथ- डेव्हिड वॉर्नरवर आयुष्यभराची बंदी?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड कडक कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.

Mar 25, 2018, 11:08 PM IST

दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला 'कुरतडलं'

बॉल कुरतडल्याच्या वादामुळे गाजलेली तिसरी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ३२२ रन्सनी जिंकली आहे.

Mar 25, 2018, 09:44 PM IST

कर्णधारपद गमावलेल्या स्टिव्ह स्मिथला आयसीसीचा आणखी एक दणका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरून डच्चू मिळाला आहे.

Mar 25, 2018, 06:34 PM IST

मुंबई- कांगारुंचा रडीचा डाव कॅमेऱ्यात कैद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 02:25 PM IST

चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाची कबुली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 02:24 PM IST