उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बसला अपघात, २ ठार

उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बसला अपघात, २ ठार

उत्तराखंडामधील चमोलीत भाविकांच्या बसला अपघात झालाय. या भीषण अपघातात २ ठार झालेत तर ३२ जण जखमी झालेत.

Friday 21, 2017, 07:57 PM IST
बस नदीत कोसळून ४४ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

बस नदीत कोसळून ४४ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात मोठी दुर्घटना आज सकाळी घडली. बस नदीत कोसळून जवळपास ४४ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

चंद्रपुरात बसच्या अपघतात तीन ठार

चंद्रपुरात बसच्या अपघतात तीन ठार

चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यात बसनं तिघांना चिरडलं. विठ्ठलवाडा बसस्थानकावर ही दुर्घटना घडलीय. 

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बसला अपघात,  १० प्रवासी जखमी

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बसला अपघात, १० प्रवासी जखमी

बोरीवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सकाळी अपघात झाला. कान्हेरी गुहांमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमाराला आलेली बस पलटली. बसमध्ये २५ प्रवासी होती.  

उस्मानाबाद  बस अपघात ५ ठार तर १५ जण जखमी

उस्मानाबाद बस अपघात ५ ठार तर १५ जण जखमी

एसटी आणि दुसरी एक बस यांच्यात झालेल्या अपघातात ५ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत. आज सकाळी हा अपघात  पुणे - हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गवर अपघात झाला.

नंदुरबारमध्ये 'जय मल्हार' बसला अपघात

नंदुरबारमध्ये 'जय मल्हार' बसला अपघात

नंदुरबारमध्ये प्रवासी बस आणि जीपची समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झालाय. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. 

नाशिकमध्ये भररस्त्यात बसचे ब्रेक फेल झाले आणि पाहा व्हिडिओ...

नाशिकमध्ये भररस्त्यात बसचे ब्रेक फेल झाले आणि पाहा व्हिडिओ...

नाशिक शहरातल्या सिडको भागात आज एक मोठा अपघात होताहोता वाचला... शहर बस वाहतूक करणाऱ्या एका बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती रिक्षा आणि दोन दुचाकींवर आदळली. 

ठाण्यात दारुड्या बस चालकाने पोलिसाला चिरडलं

ठाण्यात दारुड्या बस चालकाने पोलिसाला चिरडलं

टीएमटीच्या मद्यधुंद बस चालकानं एका पोलीस शिपायाला चिरडलंय. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली.

नवसारी बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४० वर, महाराष्ट्रातील ६

नवसारी बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४० वर, महाराष्ट्रातील ६

एस टी पूर्णा नदीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृत्यांचा आकडा ४० वर पोहचलाय. यात महाराष्ट्रीतल ६ जण जणांचा समावेश आहे. या अपघातात २३ जण जखमी झालेत. 

कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार

कल्याणमध्ये बसने मुलीला उडवलं, मुलगी जागीच ठार

कल्याणमध्ये शिळ रोड नजीक तीन वर्षांच्या एका मुलीला बसनं चिरडलं. यात ती जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने बस दगडफेक केली.

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू

पन्ना इथं बस पूलावरून पडली, 35 जणांचा जळून मृत्यू

एका खाजगी कंपनीची बस नाल्यात पडल्यानं आग लागून त्यातील 35 प्रवाशांचा जळून मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पांडव झऱ्याजवळ घडली.

एसटी बसचा अपघात, १५  शाळकरी विद्यार्थी जखमी

एसटी बसचा अपघात, १५ शाळकरी विद्यार्थी जखमी

अचलपूरजच्या चमक गावाजवळ एका एसटी बसला अपघात झालाय. बस उलटल्यामुळं १५ जणं जखमी झाले आहेत. 

इजिप्तमध्ये दोन बसना भीषण आग, 33 ठार

इजिप्तमध्ये दोन बसना भीषण आग, 33 ठार

इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागातील शर्म अल शेख या रिसॉर्टजवळील महामार्गावर दोन पर्यटन प्रवासी बसची धडक लागून लागलेल्या आगीत 33 प्रवाशी जळून खाक झालेत. तर 41 प्रवासी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

बस दरीत कोसळली; 17 जण ठार

जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागात मंगळवारी सकाळी एक प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या भीषण दूर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी अवस्थेत आहेत.

नागपूरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला बसनं चिरडलं

नागपूरकर आज हळहळले... आग्याराम देवी चौकामध्ये आज एका चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली.

९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम

बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.

लालबाग पुलावरुन बस कोसळली, सहा जखमी

मुंबईतील लालबागच्या पुलावरुन एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झालेत. ही बस साताऱ्याहून मुंबईकडे येत होती. ही घटना सकाळी घडली. या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आराम बसला सावर्डे-आगावे जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

व्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये कुलू-मंडी राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं प्रवाशांनी भरलेली बस व्यास नदीत कोसळली.

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.