daud hand

दाऊदचा हस्तक रामदास रहाणेला अटक

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला दाऊदच्या हस्तकाला अटक करण्यात यश आलं आहे. रामदास रहाणे असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अहमदनगरमधील संगमनेर येथून अटक केली. मुंबईतील एका व्यवसायीकावर हल्ला करण्याची सुपारी रामदासला देण्यात आली होती. मात्र वेळीच त्याची कुणकुण गुन्हे शाखेला लागली आणि गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी रामदास कडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली आहेत. 

Jun 24, 2018, 10:27 PM IST