marath andolan

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नवा कायदा? ओबीसीतून मराठा आरक्षण नाहीच?

Law for Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणला जाण्याची शक्यता आहे. सरकार आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Nov 17, 2023, 09:11 PM IST

जरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा

Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.  25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

Nov 16, 2023, 02:00 PM IST

जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

पुण्यात राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने स्टेजवर गोंधळ घातला. ही घटना ताजी असतानाच जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांना गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली.

Oct 20, 2023, 05:14 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,

Sep 14, 2023, 04:01 PM IST

मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Sep 13, 2023, 03:31 PM IST

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे. 

Sep 8, 2023, 07:25 PM IST

रशियातल्या युद्धजन्य परिस्थितीतही त्यांचं लक्ष मुंबईत...

रशिया आणि युक्रेन यांच्यात गुरुवारपासून तुंबळ युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु असून दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झालंय. येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.  

Feb 27, 2022, 08:52 PM IST