मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

मुलुंडमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया

इएसआयसी रुग्णालय परिसरात मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया गेलंय. याची तक्रार पाणी पुरवठा विभागाला करण्यात आली. मात्र, 10 तास उलटून गेले तरी पालिका कर्मचारी या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे पाईपलाईनमधून पाणीगळती सुरूच होती.

मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

मुंबईत शिधावाटप कार्यालयात चक्क साड्यांची खरेदी

सरकारी कार्यालयात अक्खा साडीचा स्टॉल मांडलेला कधी पाहिलाय का ?  मुलुंड मधील शिधावाटप कार्यालयात अस घडलंय.

विहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती

विहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती

मुलुंडच्या विहार लेक परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. 

मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

भाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी

भाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी

मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.

मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं. 

शहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व

शहराच्या मगरमिठीत हरवलं आदिवासी पाड्याचं अस्तित्व

मुंबई सध्या झपाट्याने विकसित होतेय. झोपडपट्ट्यांच्या जागेवर उंची टॉवर येतायत. मात्र, याच मुंबईत अशी काही ठिकाण आहेत. जी अजूनही आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतायत. अशा परिस्थितीत त्यांच्या अंध:कारमय भविष्यात एक व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलीय.

मुलुंडमध्ये सीकेपी खाद्य महोत्सव

मुलुंडमध्ये सीकेपी खाद्य महोत्सव

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा महोत्सव असणार आहे. इथए रसिकांना 50 पेक्षा अधिक पदार्थांची चव चाखता येणार आहे.

मुलुंडच्या कॉलेज ऑफ कॉमर्सची आग विझवली

मुलुंडच्या कॉलेज ऑफ कॉमर्सची आग विझवली

मुलुंड पश्चिमेकडील कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील कॉम्पुटर लॅबला आग लागली. दुपारी एक वाजेच्या दरम्यान लॅब मधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागली. 

नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू

नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू

मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

मुलूंडमध्ये दारूड्यांचा उच्छाद, पोलिसांचं दुर्लक्ष

मुलूंडमध्ये दारूड्यांचा उच्छाद, पोलिसांचं दुर्लक्ष

साईप्रस्थ विभागात असलेल्या पालिकेच्या उद्यानांमध्ये दारुड्यांनी उच्छाद मांडलाय. दिवसभर या उद्यानांमध्ये प्रेमी युगुल आणि दारुड्यांचा राबता असतो. तसंच या ठिकाणी काही बाईकरायडर संध्याकाळच्या वेळेस स्टंट करतात. त्यामुळे या विभागात राहत असलेल्या रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होतोय. 

मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत. 

मुलुंडमध्ये चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या

मुलुंडमध्ये चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या

मुलुंडमध्ये ७ वर्षीय चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे.  चिमुरडी शनिवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती. 

मुलुंडमध्ये मनसेच्या संकल्पनेतील स्वातंत्र्यदिन

मुलुंडमध्ये मनसेच्या संकल्पनेतील स्वातंत्र्यदिन

देशाचा ७० वा स्वातंत्र्यदिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा उत्साहात साजरा करणार आहे. 'माझी पाच मिनिटं, माझ्या राष्ट्रगीतासाठी' या संकल्पनेअंतर्गत मुलुंडमधे मनसेचे कार्यकर्ते स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मेहनत घेत आहेत. 

मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू

मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू

मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली. 

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!

आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक

बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक

मुलुंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अवघ्या एका महिन्याचा एक चिमुकला जीव एका बसच्या चाकाजवळ जिवंत सापडलाय.

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता... पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

तिची आत्महत्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासातून, तिघांना अटक

तिची आत्महत्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासातून, तिघांना अटक

मुलुंडमध्ये शनिवारी एका अल्पवयीन मुलीनं महावीर टॉवर या १२ मजली रहिवासी इमातीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या मुलीच्या आत्महत्येचं गुढ आता उकललं असून आरोपीच्या एकतर्फी प्रेमातून ही घटना झाल्याच समोर आलंय. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.