mumbai local train rush

Mumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या...

Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 19, 2023, 08:24 AM IST

Trending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...

Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. 

Oct 19, 2022, 12:39 PM IST

रेल्वेचा खोळंबा, विद्यार्थ्यांना फटका

कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला. मात्र, याची दखल घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी वेळ वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. तर ज्यांची परीक्षा चुकली त्यांची नव्याने घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Apr 18, 2012, 04:05 PM IST

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

मध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.

Apr 18, 2012, 02:10 PM IST

मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल, एक्सप्रेस गाड्या रद्द

मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी उसळल्याने अर्धा ते एक तासाने धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल बिघाड दुरुस्तीला दोन ते तीन दिवस लागणार आहेत. सिग्नल बिघाडाचा लांब पल्ल्याच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. प्रगती, सिंहगड, गोदावरी आणि राज्यराणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

Apr 18, 2012, 09:35 AM IST