राज्यात शेतीची नशा

सुरेंद्र गांगण

बीड, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अफूची शेती फोफावत आहे. बीड जिल्ह्यात प्रथम अफूच्या शेतीची पाळेमुळे दिसून आली. मात्र, ही पाळेमुळे खोलवर रूजलेली होती. कृषी अधिकाऱ्यांना चक्क चुना लावून अन्य शेतीच्या नावाखाली अफूची पेरणी केली गेली. ही पेरणी बक्कळ पैसा मिळविण्यासाठीच झाल्याचे स्पष्ट होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी या शेतीची नशाच शेतकऱ्याला पडलेली दिसून येत आहे.

गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड

सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.

अफूच्या शेतीच्या चौकशीचे आदेश

बीड जिल्ह्यातल्या अफूच्या शेतीप्रकरणात महसूल अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खोटी शेती दाखवून अफूची शेती का केली, याची चौकशीनंतर बाब उघड होणार असल्याने कृषी अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत.