मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार

मुंबईसह कोकणातील प्राध्यापकांची थकबाकी मिळणार

मुंबई आणि कोकणातील प्राध्यापकांना ७३ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

द्या नेट-सेट आणि व्हा सेट...

नेट- सेटची परीक्षा प्रत्येक प्राध्यापकाला द्यावीच लागेल, याचा पुनरूच्चार राज्य सरकारतर्फे मंगळवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला. प्राध्यापकांच्या १३ मागण्यांपैकी ११ मागण्या मान्य केल्या आहेत.

आयआयटी, एनआयटी वाऱ्यावर... ४३% जागा रिकाम्या!

देशातील मान्यताप्राप्त आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’ या संस्थांमधील प्राध्यापकांच्या निम्म्यापेक्षा जास्त जागा या रिकाम्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'बीएससी' आणि 'टीवायबीकॉम'च्या परीक्षा अडचणीत!

गेल्या 41 दिवसांपासून एमफुक्टोने पुकारलेला बहिष्कार चिघळला आहे. मंगळवारपासून कोणतीही परीक्षा होऊ देणार नाही असा पवित्रा संघटनेने घेतला असून यामुळे सुरु असलेले बीएस्सी प्रात्यक्षिक आणि टीवाय बीकॉमच्या परीक्षा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

उच्च शिक्षण मंत्र्यांचा प्राध्यापकांना इशारा

उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घालणाऱ्या प्राध्यापकांना दोन दिवसांत संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचं आवाहन सरकारनं केलंय. दोन दिवसांत संप मागे घेतला नाही तर कारवाई करू, असा सज्जड इशारा उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय.