raj thakre

नाशिकचा बालेकिल्ला शिवसेना मनसेकडून मिळवणार?

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.

Dec 30, 2013, 08:16 PM IST

जेव्हा दोन व्यंगचित्रकार भेटतात...

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे पेंटिंग्ज आणि व्यंगचित्रांचं मुंबईत प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक हजेरी लावली.

Dec 19, 2013, 02:41 PM IST

ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

Dec 19, 2013, 01:58 PM IST

... तर मनसे खळ्ळ खट्याक करणार!

राज्यातल्या औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळालाय. तर दुसरीकडे मनसेनं या बंदविरोधात भूमिका घेतली आहे.

Dec 16, 2013, 07:13 PM IST

अभिनेता सचिनचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश!

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केलाय. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राजगड इथं झालेल्या कार्यक्रमात सचिन यांनी मनसे चित्रपट सेनेत प्रवेश केलाय.

Dec 9, 2013, 02:10 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंचा एल्गार!

एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारलाय. साडेसतरा टक्के प्रवासी कर रद्द करावा अशी मागणी करणारं पत्र राज यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय.

Dec 5, 2013, 02:36 PM IST

जाणार मोहन ‘मनसे’कडेच!

शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर `चालला मोहन कुणीकडे?` अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं आता मोहन रावले मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जातंय.

Dec 3, 2013, 08:47 PM IST

पुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस

पुणे शहर मनसेमधली धुसफूस अखेर पोलिसांपर्यंत पोचलीय. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाराजी नाट्यानं रविवारी खळळ खट्याकचं रूप धारण केलं. महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या शहर कार्यालयातच हा प्रकार घडला.

Dec 2, 2013, 05:53 PM IST

शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांना डावललं जातंय?

शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले एकेक मोहरे गळत असल्याचं चित्र निर्माण झालंय. आपल्याला डावललं जात असल्याची शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना होत असल्याचंच यामुळं स्पष्ट झालंय...

Nov 23, 2013, 08:19 AM IST

शिवसेनेचे माजी खासदार राज ठाकरेंच्या भेटीला!

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. रावले-राज यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतंय.

Nov 22, 2013, 01:47 PM IST

राज ठाकरेंच्या निर्णयामुळं मनसेत नाराजी

मनसे चित्रपट कर्मचारी सेनेला आज ग्लॅमरचा तडका देण्यात आला. मराठी हिंदी सिनेसृष्टीतल्या स्टार्सच्या आज थेट पदांवर नियुक्त्या करताना राज ठाकरे यांनी संघटनेत कठोर फेरबदलही केलेत. एकीकडे राज कुंद्रा प्रकरणात वादात सापडलेल्या नेत्यांना अभय देण्यात आलं. पण त्याचवेळी याप्रकरणाशी संबंधित पदाधिकाऱ्यांना पदावरुन हटवल्यानं पक्षात नव्या वादाला तोंड फुटलंय.

Nov 18, 2013, 09:27 PM IST

बाळासाहेबांविना शिवसेना!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वजा शिवसेना हा अनुभव गेल्या वर्षभरात सर्वांनीच घेतला. बाळासाहेब गेल्यानंतर गेल्या वर्षभरात शिवसेनेत अनेक स्थित्यंतर झाली.

Nov 16, 2013, 09:45 PM IST

ठाकरे कुटुंबातील तीन दिग्गज व्यक्तीमत्त्व!

दिवाळीनिमित्त घेतलेल्या खास मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणी जागवल्या. श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू राज ठाकरेंनी सांगितले.

Nov 3, 2013, 04:17 PM IST

लोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व

शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.

Oct 29, 2013, 11:37 AM IST

राज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बहुधा अलिखित करार झालाय की काय अशी शंका येऊ लागलीय. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघे ठाकरे चुलत बंधू सध्या एकमेकांविरूद्ध टीका करणं टाळत असल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 14, 2013, 08:51 PM IST