'रिव्हर्स गिअर'सहीत भारतात दाखल झाली पहिली बाईक

'गोल्ड विंग' ही बाईक भारतात पहिल्यांदा २०१८ च्या ऑटो एक्सपो प्रदर्शनात दिसली होती

Updated: Jul 8, 2018, 05:00 PM IST
'रिव्हर्स गिअर'सहीत भारतात दाखल झाली पहिली बाईक title=

मुंबई : जपानची टू व्हीलर बनवणाऱ्या कंपनीची भारतीय पार्टनर होंडानं '२०१८ होंडा गोल्ड विंग' बाईकची भारतात डिलिव्हरी सुरू केलीय. या बाईगचं वैशिष्ट्य म्हणजे, 'रिवर्स गिअर' असणारी ही भारतातली पहिली टू व्हीलर ठरलीय. या बाईकचे तीन युनिट कोचीनमध्ये डिलिव्हर्ड करण्यात आलेत. 'गोल्ड विंग' ही बाईक भारतात पहिल्यांदा २०१८ च्या ऑटो एक्सपो प्रदर्शनात दिसली होती. 

रिव्हर्स गिअर

या नव्या बाईकची इंजिन क्षमता ९३ हॉर्स पॉवर आहे. होंडा गोल्ड विंगमध्ये गिअर लिवर किंवा क्लच नाही. गिअर शिफ्ट एका बटनाद्वारे कंट्रोल केलं जाऊ शकतं. हे बटन हॅन्डलबारवर देण्यात आलंय. या बाईकमध्ये ड्युएल क्लच ट्रान्समिशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 

इंजिन आणि पावर

2018 Gold Wing मध्ये १,८३३ सीसीचं इंजिन देण्यात आलंय. हे इंइन ५,५०० आरपीएमवर १२५ बीएचपीची पावर जनरेट करतं. ४,५०० आरपीएमवर हे इंजिन १७० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनला ७ स्पीड ट्रान्समिशन सिस्टम देण्यात आली आहे. 

या बाईकमध्ये अॅप्पल कार प्ले इंटग्रेशनची सुविधाही देण्यात आलीय. बाईकमध्ये ७ इंचाचा टीएफटी टचस्क्रीन देण्यात आलाय. याला अॅप्पल आयफोनशी कनेक्ट केलं जाऊ शकतं. यामध्ये तुम्ही अॅप्पल मॅप, अॅप्पल म्युझिक आणि एका स्मार्ट ऑडिओ सिस्टमचा वापरही करू शकता. हा ऑडिओ सिस्टम ब्लू टूथनं जोडण्यात आलाय... त्यामुळे तुम्हाला हेल्मेट काढण्याशिवाय फोन कॉलला उत्तर देता येऊ शकतं. 

बाईकमध्ये यूएसबी पोर्ट, क्रूस कंट्रोल, इलेक्ट्रीक विंड स्क्रीनही देण्यात आलीय. या बाईकची किंमत जवळपास २६ लाख ८५ हजार रुपये (दिल्ली शोरुम) असेल.