Aadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या

Aadhar Card :  जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर भविष्यात अनेक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्डवरील नाव असो किंवा आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता असो हे सगळं अगदी अचूक पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड अपडेटबद्दल आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

Updated: Oct 26, 2022, 07:10 AM IST
 Aadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या title=
aadhaar new update and aadhar card rules nmp

Aadhar Card Name Change Request Status : आधार कार्ड (Aadhar Card) हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. आजकाल छोट्या मोठ्या कुठल्याही कामासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आज सगळ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे. कुठल्याही कामासाठी आधार कार्ड नंबर गरजेचा आहे. आधार कार्ड हे आपलं ओळखपत्र असल्याने त्याबद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर भविष्यात अनेक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्डवरील नाव असो किंवा आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता असो हे सगळं अगदी अचूक पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड अपडेटबद्दल आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

कुठल्या गोष्टी अपडेट असाव्यात

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) काम मदत करत असते. आधार हा एक अत्यंत महत्त्वाचा असल्याने यावरील माहिती ही अधिकृत आणि अचूक असणे महत्त्वाचे आहे. UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, लिंग इत्यादी माहिती बदलण्याची सुविधा प्रदान करते. तुम्ही किती वेळा आधार अपडेट करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो. (aadhaar new update and aadhar card rules nmp)

नाव किती वेळा बदलता येतं? (Name Update in Aadhar Card)

आधार कार्डवरील नाव किती वेळा बदलता येतं असा प्रश्न अनेकांना असतो. तर आधार कार्डमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आडनाव बदलायचं असेल तर त्या करू शकतात. UIDAI ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये नाव बदलण्याची परवानगी देते. पण, आधार कार्डमधील नाव अपडेट फक्त दोनदाच करता येईल.

लिंग बदलण्याची परवागी आहे का? (Gender Update in Aadhar Card)

जर तुमचं लिंग आधार कार्डवर चुकीचं टाकलं असेल तर काळजी करण्याचं कारण नाही.  UIDAI च्या नियमांनुसार यामध्ये बदल केले जाऊ शकतात. UIDAI आधार कार्डमध्ये लिंग अपडेट करण्याची फक्त एक संधी देते.

अशा DOB मध्ये बदल करा (Date Of Birth Update in Aadhar card)

UIDAI नुसार, जर एखाद्या व्यक्तीने आधार कार्डमध्ये चुकीची जन्मतारीख टाकली असेल तर ती एकदाच अपडेट केली जाऊ शकते. त्यानंतर त्यात कोणतेही बदल करता येणार नाहीत.

 
यात बदल करण्यासाठी मर्यादा नाही

तुमच्या आधारमध्ये तुम्हाला घराचा पत्ता (Home Address) , ईमेल आयडी (Email ID), मोबाईल नंबर  (Mobile Number), फोटो (Photograph), फिंगर प्रिंट (Finger Print) आणि रेटिना स्कॅन (Retina Scan) वारंवार अपडेट करावे लागतील. त्यांना अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.