Apple Car: अ‍ॅपल कारबाबत उत्सुकता शिगेला, किंमत आणि कधी होणार लाँच? जाणून घ्या

Apple Car: अ‍ॅपल कंपनीच्या प्रोडक्टचा एक वेगळाच दर्जा आहे. आयफोन, मॅकबूक, टॅबलेट, ईअरबड्स याबाबत तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अ‍ॅपल आयफोनच्या नव्या सीरिजबाबत कायमच उत्सुकता राहिलेली आहे. असा असताना आता अ‍ॅपल कारची चर्चा रंगू लागली आहे. 

Updated: Dec 14, 2022, 07:04 PM IST
Apple Car: अ‍ॅपल कारबाबत उत्सुकता शिगेला, किंमत आणि कधी होणार लाँच? जाणून घ्या title=

Apple Car: अ‍ॅपल कंपनीच्या प्रोडक्टचा एक वेगळाच दर्जा आहे. आयफोन, मॅकबूक, टॅबलेट, ईअरबड्स याबाबत तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अ‍ॅपल आयफोनच्या नव्या सीरिजबाबत कायमच उत्सुकता राहिलेली आहे. असा असताना आता अ‍ॅपल कारची चर्चा रंगू लागली आहे. आतापर्यंतचे प्रोडक्टच इतके भारी आहेत की उत्सुकता असणारच. मात्र ही कार कधी लाँच होणार याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. नुकतंच ब्लूमबर्गने अ‍ॅपलच्या कारबाबत एक रिपोर्ट फाईल केला आहे. या रिपोर्टनुसार, अ‍ॅपल कार काही देशांसाठी डिझाईन केली आहे. म्हणजेच ही संपूर्ण जगभर लाँच होणार नाही, असंच यावरून दिसत आहे. मर्सिडीज, टेस्ला, GM हमर इव्ही आणि इतर इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत ही कार स्वस्त असेल, असं बोललं जात आहे. अ‍ॅपल कारची मर्सिडीज आणि टेस्लाशी स्पर्धा असेल. अ‍ॅपलच्या मस्त कारमध्ये अ‍ॅपल सिलिकॉन चिपसेट वापरण्यात येणार असल्याचे सांगतिलं जात आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की हा चिपसेट अ‍ॅपलच्या चार हाय-एंड MAC चिप्सच्या बरोबरीचा असेल. कंपनीचे सिलिकॉन इंजिनियर्स चिप्स विकसित करणार आहेत.

अ‍ॅपल कारमध्ये काय असेल खास?

अ‍ॅपलनं सेल्फ ड्रायव्हिंग कारची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा आहे. आता लाँचिंग डेट 2026 पर्यंत पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीने 8 वर्षांपूर्वी सेल्फ ड्रायव्हिग कारवर काम करण्यास सुरुवात केली होती. या कारची किंमत 1 लाख डॉलर्स असू शकते. अ‍ॅपलच्या कारमध्ये स्टिअरिंग व्हील आणि पेडल्स नसल्याची बातमी होती. पण कंपनीची अशी कोणतीही योजना नाही. कंपनीच्या एका सूत्राने ब्लूमबर्गला सांगितले की, कंपनी कारच्या डिझाइनमध्ये काहीही वेगळे करणार नाही, कारमध्ये स्टीयरिंग व्हील आणि पेडल्स असतील.

बातमी वाचा- Petrol-CNG विसरा! आता मारुति सुझुकीची WagonR धावणार या इंधनावर

अ‍ॅपल कारची किंमत आणि लाँच तारीख

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, कारची किंमत सुमारे 1 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 80 लाख रुपये असेल. पण कंपनी कारची किंमत आणखी कमी करण्याचा विचार करत आहे. जर ही कार कंपनी 2026 मध्ये कार बाजारात सादर करू शकते.