स्वस्त झाले सगळे iPhone, केवळ चार दिवसांसाठी मिळतोय मोठ डिस्काऊंट

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर चार दिवसांचा 'Apple day sale' सेल सुरू आहे. हा सेल २७ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन एक्स, आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयपॅड, मॅकबूक आणि अ‍ॅपल वॉचवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 27, 2018, 09:07 PM IST
स्वस्त झाले सगळे iPhone, केवळ चार दिवसांसाठी मिळतोय मोठ डिस्काऊंट title=

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर चार दिवसांचा 'Apple day sale' सेल सुरू आहे. हा सेल २७ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन एक्स, आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयपॅड, मॅकबूक आणि अ‍ॅपल वॉचवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. 

एसबीआय कार्डवर डिस्काऊंट

या सेलमध्ये एसबीआय कार्ड यूजर्सना जास्त फायदा मिळणार आहे. कारण सेलमध्ये खरेदीसाठी जर तुम्ही एसबीआयचं डेबिट कार्ड वापरलं तर ५ टक्के अतिरीक्त डिस्काऊंट दिला जाणार आहे. इतकेच नाहीतर एसबीआय यूजर्सना EMI पर्यायही आहे. 

कोणत्या फोनची किती किंमत?

- आयफोन एक्स - सेलमध्ये आयफोन एक्सच्या ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ८२ हजार ९९९ रूपये तर २५६ जीबी व्हेरिएंट ९७ हजार ९९९ रूपयांमध्ये दिला जातोय. 

- आयफोन ८ - आयफोन ८ चा ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड फोन ५४ हजार रूपयात, आयफोन ८ २५६ जीबीचा फोन ६९ हजार ९९९ रूपयात, आयफोन ८ प्लसचा ६४ जीबीचा सिल्वर ग्रे आणि गोल्ड फोन ६४ हजार ९९९ रूपयात, आयफोन ८ प्लसचा ६४ जीबीचा सिल्वर फोन ६५ हजार ९९९ रूपयात, तर आयफोन ८ प्लस २५६ जीबीचा फोन ७९ हजार ९९९ रूपयात मिळेल. 

- आयफोन ७ ३२ जीबी फोनचा ब्लॅक आणि रोज गोल्ड व्हेरिएंट ४१ हजार ९९९ रूपयात मिळतो आहे. आयफोन ७ ३२ जीबीचं गोल्ड आणि सिल्वर व्हेरिएंट ४२ हजार ९९९ आणि ४३ हजार ९९९ रूपयात मिळत आहे. आयफोन ७ चं १२८ जीबी व्हेरिएंट ५५ हजार ९९९ रूपयात मिळत आहे. 

- आयफोन ७ प्लसचं ३२ जीबी व्हेरिएंट ५६ हजार ९९९ रूपयात, आयफोन ७ प्लस ३२ जीबी गोल्ड व्हेरिएंट ५७ हजार ८८५ रूपयात मिळतो आहे. आयफोन ७ प्लस १२८ जीबी जेट ब्लॅक व्हेरिएंट ७९ हजार रूपयात खरेदी केलं जाऊ शकतं. 

- आयफोन ६ चं ३२ जीबी स्पेस ग्रे मॉडल २४ हजार ९९९ रूपयात, आयफोन ६ चं ३२ जीबी गोल्ड मॉडल २५ हजार ९९९ रूपयात. आयफोन ६ एस ३२ जीबीचं स्पेस ग्रे मॉडल ३२ हजर ९९९ रूपयात आणि आयफोन ६ एस ३२जीबीचं गोल्ड मॉडल ३३ हजार ९९९ रूपयात मिळतो आहे. 

- आयफोन - एसई चं ३२ जीबी स्पेस ग्रे, रोज गोल्ड व्हेरिएंट १८ हजार ९९९ रूपयात आणि आयफोन एसई ३२ जीबीचं सिल्वर व्हेरिएंट २० हजार ९९९ रूपयात खरेदी करू शकता. 

- फ्लिपकार्टवर अ‍ॅपल वॉच सीरिज ८५०० रूपयात खरेदी केली जाऊ शकते. आणि आयपॅडला २२ हजार ९०० रूपयात खरेदी करू शकता.