कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

Job News : एखाद्या संस्थेमध्ये थोडक्यात नोकरीच्या निमित्तानं ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत असता तेव्हा खात्यात येणाऱ्या पगाराव्यतिरिक्त अनेक गोष्टींची अपेक्षा कर्मचारी ठेवतात.   

सायली पाटील | Updated: Nov 1, 2023, 11:29 AM IST
कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?  title=
apple employee gets 10 year anniversary gift will make you search for job opportunities there

Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते. 

दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये, किंवा अशाच काही Employee Policies पूर्ण करण्यामध्ये काही कंपन्या विशेष मेहनत घेतात. Apple ही त्यात मागे नाही. 

कर्मचाऱ्याला कंपनीत 10 वर्षे पूर्ण झाली आणि... 

हल्लीच अॅपल कंपनीत मार्कोस अलोन्सो नावाच्या एका कर्मचाऱ्यानं अॅपलमध्ये नोकरीची 10 वर्षे पूर्ण केली. कारकिर्दीतील हा मैलाचा दगड गाठणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या या यशासाठी त्याच्या पाठीवर कंपनीनंही कौतुकाची थाप दिली. इतकंच नव्हे, तर एक खास भेटही त्याला कंपनीनं दिली. (Apple Jobs)

हेसुद्धा वाचा : LPG Price: नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी झटका; गॅस सिलेंडरचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढले 

मार्कोसला मिळालेली ही भेट आणि कंपनीकडून त्याच्याप्रती आभार व्यक्त करण्याची पद्धत पाहून तुम्हीही म्हणाल, कोणी आम्हाला इथं नोकरी देतंय का? 

कंपनीनं दिली खास भेट 

अॅपलकडून कर्मचाऱ्याला एक सुरेख असं स्मृतीचिन्हं आणि एक भेटवस्तू दिली. अॅपलचं चिन्हं असणाऱ्या एका बॉक्समध्ये हे स्मृतीचिन्हं असून, त्यावर या कर्मचाऱ्यासाठी Apple चे CEO टीम कुक यांनी त्याच्यासाठी लिहिलेला एक खास संदेशही पाहायला मिळाला. या संदेशावर त्याच्या कारकिर्दीसाठी आणि कंपनीप्रती दिलेल्या योगदानासाठी मनापासून आभार मानण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांप्रती काहीतरी खास करण्याची अॅपलची ही पहिलीच वेळ नाही. विविध प्रसंग, Christmas, New Year या आणि अशा अनेक प्रसंगांना कंपनीकडून कायमच कर्मचाऱ्यांना काही खास गोष्टी भेटवस्तू स्वरुपात दिल्या जातात. एकिकडे भारतामध्ये नोकरीचे तास आणि तत्सम मुद्द्यांवरून वाद सुरु असतानाच दुसरीकडे मात्र अॅपलसारख्या कंपन्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यस्थानी ठेवत एका Healthy आणि कर्मचाऱ्यांसाठी पूरक वातावरणाची निर्मिती करताना दिसत आहेत असं म्हणायला हरकत नाही.