iPhone 16 सीरीजमध्ये लाँच होणार 5 स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

iPhone 16: आयफोन 16 या वर्षात सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. त्याआधीच त्याचे डिटेल्स लीक झाले आहेत. फिचर्स आणि किंमतदेखील किती आहे जाणून घेऊया.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 17, 2024, 04:19 PM IST
iPhone 16 सीरीजमध्ये लाँच होणार 5 स्मार्टफोन, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या title=
Apple iPhone 16 Series Leaks Price and features

iPhone 16: 2023मध्ये iPhone 15 सीरीज लाँच झाली आहे. अॅपलच्या या सीरीजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता अॅपल युजर्सना आयफोन 16चे वेध लागले आहेत. कंपनी या वर्षीही दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. आयफोन 16 लाँच होण्याआधीच स्मार्टफोनचे सर्व डिटेल्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी यावर्षी 5 स्मार्टफोन लाँच करु शकते. 

लीक झालेल्या रिपोर्टनुसार कंपनी यावर्षी  iPhone 16, iPhone 16 Pro और iPhone 16 Pro Max सोबत दोन SE मॉडलदेखील लाँच करु शकतात. आयफोन 16च्या फिचर्सबद्दल सर्व काही जाणून घेऊया. टिप्स्टर Majin Bu यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार, कंपनी यावर्शी दोन iPhone 16 SE मॉडल लाँच करण्याची शक्यता आहे. टिप्सरने या फोनच्या किंमतीबाबत काही डिटेल्सही शेअर केले आहे. 

कंपनीने SE मॉडल्स याआधीही लाँच केले होते. मात्र, त्यापुढे कधीच नंबर सीरीज लावली नव्हती. लीक रिपोर्टनुसार, या वर्षात SE लाइन-अपला फ्लॅगशिप लाइनअपसोबत मर्ज करु शकतात. याचा एक रेंडरदेखील समोर आले आहे. ज्यात सर्व मॉडल्सच्या कॅमेरा मॉड्युल स्पष्टपणे दिसून येतेय.  

आयफोन 16 सीरीजमध्ये काय खास?

iPhone 16 SE आणि iPhone 16 SE Plus मध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, iPhone 16मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि प्रो मॉडल्समध्ये ट्रिपल रिअय कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मात्र फोनचे हे सर्व डिझाइन iPhone आणि iPhone 15पेक्षा खूप वेगळे आहेत.

यावेळी कंपनीने कॅमेरा सेटअप वर्टिकल दिला आहे. त्याचबरोबर iPhone 16 SE मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 60 HZ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. त्याचबरोबर iPhone 16 SE Plus मध्ये 6.7 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. 60 HZ रिफ्रेश रेट सपोर्ट करते. 

दोन्हीही फोनमध्ये Dynamic आयलँड फिचर्स मिळू शकते. त्याचबरोबर iPhone 16 आणि iPhone 16 Pro मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. यात 120 HZ रिफ्रेश सपोर्ट करतो. तेच  iPhone 16 Pro Maxमध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.

किंमत किती असू शकते?

 iPhone 16 SEची किंमत 699 डॉलर म्हणजेच जवळपास 58 हजार असू शकते. ही किंमत 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी असू शकते. त्याचबरोबर iPhone 16 SE Plus ची किंमत 799 डॉलर म्हणजेच 66 हजार रुपये असू शकते. ज्यात 256 GB स्टोरेज व्हेरियंटचा पर्याय आहे. 

तर iPhone 16 च्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $699 असू शकते. मात्र, ही किंमत iPhone 16 SE च्या बरोबरीची आहे, त्यामुळे यावर विश्वास ठेवता येणार नाही. यामध्ये 256GB स्टोरेज असलेल्या iPhone 16 Pro ची किंमत 999 डॉलर (जवळपास 83 हजार रुपये) असू शकते. तर प्रो मॅक्स वेरिएंटची किंमत 1099 डॉलर्स (सुमारे 91 हजार रुपये) असू शकते. तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की या सर्व किंमती केवळ शक्यता आहेत.