आता येणार गवताच्या पात्याप्रमाणे वाकणारा iPhone

येत्या वर्षांत iPhone आणखी नवीन काय लॉन्च करणार याकडे आयफोन चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्यात. 

Updated: Nov 24, 2017, 04:42 PM IST
आता येणार गवताच्या पात्याप्रमाणे वाकणारा iPhone title=

नवी दिल्ली : येत्या वर्षांत iPhone आणखी नवीन काय लॉन्च करणार याकडे आयफोन चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्यात. 

मार्केटमध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान एक नवीन पेटेंट समोर आलंय... या पेटेंटमुळे आयफोन कंपनी सध्या एखाद्या फोल्डेबल फोनवर काम करत असल्याचं समोर येतंय. 

अमेरिकन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिसनं अॅपलनं पेटेंटसाठी दाखल केलेलं एक निवेदन सादर केलं. यामध्ये गवताप्रमाणे वाकणाऱ्या फोल्डेबल डिस्प्लेचा उल्लेख आहे. 

'पेटेंट'मध्ये काय?

'एका एलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये असा एखादा भाग असेल जो डिव्हाइस वाकवण्याचं काम करेल' असं या पेटेंटमध्ये म्हटलं गेलंय. तसंच डिव्हाइसमध्ये मायक्रो OLED स्क्रीन असेल जी iPhone X मध्ये दिल्या गेलेल्या OLED डिस्प्लेला रिप्लेस करेल. 

यापूर्वी अॅपल फोल्डेबल डिस्प्लेसाठी 'एलजी'सोबत काम करत असल्याचीही चर्चा होती. तसंच गेल्या दोन वर्षांपासून सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनरव काम करत असल्याचीही चर्चा बाजारात होती. परंतु, आत्तापर्यंत बाजारात असा कोणत्याही कंपनीचा कोणताही डिव्हाइस लॉन्च झालेला नाही.