OLA चा डबल धमाका, स्वातंत्र्यदिनी केली मोठी घोषणा

4 सेकंदात 100 किमीचा वेग, अत्याधुनिक आणि बरंच काही... पाहा OLA ने काय केलीय घोषणा  

Updated: Aug 15, 2022, 04:09 PM IST
OLA चा डबल धमाका,  स्वातंत्र्यदिनी केली मोठी घोषणा title=

OLA Electric : ओला इलेक्ट्रिकने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रीक कारची (Electric Car) झलक जगासमोर आणली आहे. यासोबतच कंपनीने नवीन इलेक्ट्रीक स्कूटर Ola S-1 ही लाँच केली आहे. कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार Ola S-1 ची सुरुवातीची किंमत  99,999 रुपये इतकी असेल. OLA चं हे दुसरं इलेक्ट्रीक उत्पादन आहे. 

इलेक्ट्रीक कारची जबरदस्त रेंज
ओलाची इलेक्ट्रीक कार 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असून अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा (Technology) वापर यात करण्यात आला आहे. ओलाच्या या इलेक्ट्रीक कारची रेंज 500 किलोमीटर इतकी जबरदस्त असणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ओलाची ही पहिली इलेक्ट्रीक कार सेडान सेगमेंटमधली असू शकते.

कारला ग्लास रूफ
ओला इलेक्ट्रिक कारला ऑल ग्लास रूफ (glass roof) देण्यात आलं आहे. यामुळे कारच्या एरो-डायनॅमिक्समध्ये सुधारणा होईल. ओलाने नुकतीच आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली आहे. ओल्याच्या इलेक्ट्रीक कारमध्ये चावीची गरज भासणार नाही, इतकंच नाही तर ड्रायव्हर लेसही असणार आहे. शिवाय यात असिस्टेड ड्रायव्हिंग फीचर्स देखील मिळतील. 

ही करा सर्वात वेगवान असेल तसंच भारतातील ही सर्वात स्पोर्टी लूक असणारी कार असेल असा दावा कंपनीने केला आहे. तामिळनाडू इथल्या कारखन्याता या कारचं उत्पादन होईल.

Ola S-1 स्कूटरची बुकिंग
दरम्यान ओला कंपनीने Ola S-1 ही इलेक्ट्रीक स्कुटर बाजारात लाँच केली आहे. Ola S-1 ची बुकिंग आजपासून सुरु झाल्याचं सीईओ भावेश अग्रवाल यांनी सांगितलं आहे. केवळ 499 रुपये भरून ही इलेक्ट्रीक स्कूटर तुम्हाला बूक करता येणार आहे. Ola S-1 डिलीवरी 7 सप्टेंबरपासून सुरु होणार असून पाच रंगात उपलब्ध असणार आहे. Ola S-1 ची डिझाईन काही अंशी एस-1 प्रो सारखी आहे.

ओला एस-1 प्रो ही स्कूटर कंपनीने गेल्या वर्षी लाँच केली होती. Ola S-1 मध्ये 3 kWh ची बॅटरी आहे. तसंच कंपनीने दावा केला आहे की नव्या स्कूटरची रेंज 131 किलोमीटर असून टॉप स्पीड  95 km/h इतका आहे.