Video Call पे आओ ना... Please....; Request स्वीकारताच पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल

Video Call करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता Scam च्या जाळ्यात अडकतं असतील त्याचेही खूप नुकसान होऊ शकते. 

Updated: Aug 23, 2022, 02:41 PM IST
Video Call पे आओ ना... Please....; Request स्वीकारताच पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल  title=

मुंबई: Whatsapp, facebook Messenger आणि Instagram सोशल मिडीयावरील लोकप्रिल प्लॅटफॉर्म आहेत. मात्र हेच लोकप्रिय प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता व्हिडिओ कॉल करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता Scam च्या जाळ्यात अडकतं असतील त्याचेही खूप नुकसान होऊ शकते. 

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर किंवा व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल येत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेक वेळा युजर्स मेसेज पाठवून फसवण्याचाही प्रयत्न करत असतात. या घोटाळ्याचा संदेश आमच्या एका सहकाऱ्याकडूनही आला होता. आम्ही त्याच्याशी याबद्दल बोललो. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका Instagram Users ला पेजवर अनोळखी व्यक्तीची Follow करण्याची विनंती येते. फॉलो रिक्वेस्ट पाठवणारी एक मुलगी आहे. त्यानंतर मेसेजवर देखील रिक्वेस्ट येऊन व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले जाते. आपण व्हिडिओ कॉल करताच समोर एक मुलगी असते आणि लगेचचं तिचे कपडे काढू लागते. ज्या Instagram Users ला जो फेक कॉल आला, त्या व्यक्तीने कपडे काढणारी मुलगी बघताच क्षणी व्हीडीओ कॉल कट केला.

मात्र कॉल कट होण्यापूर्वी फेक कॉल करणाऱ्यांकडून काही स्क्रीनशॉट घेतले होते. ज्यामध्ये Instagram Users चा चेहरा कैद झाला. त्यानंतर त्या स्क्रीनशॉटच्या आधारे ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो.  सतत त्या आयडीवरून मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जाते. त्यासाठी त्यांना २४ तासांचा वेळही दिला जातो. पैसे न दिल्यास स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामी होण्याच्या भीतीने अनेकजण या scam च्या जाळ्यात येतात. 

अशा परिस्थितीत अशा scam पासून सावध राहणे गरजेचे आहे. याबाबत सायबर एक्सपर्ट हिमांशू कुमार दीपू सांगतात की, सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे.