VIDEO : चायनीज सुंदरी म्हणतेय 'बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल'

लाल किनार असलेली पांढऱ्या रंगाची साडी या चायनीज सुंदरीवर खूपच छान दिसतेय

Updated: Apr 13, 2019, 12:34 PM IST
VIDEO : चायनीज सुंदरी म्हणतेय 'बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल'  title=

मुंबई : २००१ मध्ये आलेल्या मल्टी स्टारर सिनेमा 'लज्जा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा एक गाणं खूपच गाजलं होतं. 'बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल' म्हणत माधुरीनं डोळे मिचकावले आणि प्रेक्षक तिच्या अदांनी घायाळ झाले... या डान्ससाठी माधुरीची क्रेझ काही आजही प्रेक्षकांत कमी झालेली नाही... पण, आता माधरीसोबतच आणखीन एका तरुणीनं या गाण्यावर डान्स करत अनेकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलंय. 

इंटरनेटवर सध्या या तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ Devesh Mirchandani नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरून अपलोड करण्यात आलाय. व्हिडिओत तरुणीसोबत तिचा ग्रुपही जबरदस्त डान्स करताना दिसतोय. 

लाल किनार असलेली पांढऱ्या रंगाची साडी या चायनीज सुंदरीवर खूपच छान दिसतेय. हा व्हिडिओ या ७ एप्रिल रोजी अपलोड करण्यात आलाय. 

या व्हिडिओला लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळालेतच परंतु, अनेक प्रतिक्रियाही प्रेक्षकांनी आवर्जून नोंदवलेल्या दिसत आहेत.