फेसबुकचे हे तीन सिक्रेट फीचर्स माहीत आहेत का ?

आजकाल फेसबुकचा वापर वाढला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 14, 2017, 05:37 PM IST
फेसबुकचे हे तीन सिक्रेट फीचर्स माहीत आहेत का ? title=

नवी दिल्ली : आजकाल फेसबुकचा वापर वाढला आहे. लहानापासून ते अगदी जेष्ठांपर्यंत सर्वांमध्ये फेसबूक अतिशय लोकप्रिय आहे. मात्र फेसबुकचा योग्य वापर कसा करायचा, त्याचे कोणकोणते फीचर्स आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. फेसबुकचे काही फीचर्स असे आहेत जे कायम कमी येतील. या फीचर्सबद्दल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असेच तीन महत्त्वपूर्ण फीचर्स जाणून घेऊया. हे फीचर्स नाहीत तर सिक्रेट फीचर्स आहेत. 

फेसबुक ४ फेब्रुवारी २००४ मध्ये लॉन्च झालं. फेसबुकच्या रिपोर्टनुसार २०१७ पर्यंत फेसबुकचे मंथली  यूजर्स २.०७ बिलियन आहेत. मोबाईल युजर्सचा विचार केल्यास १.१५ बिलियन युजर्स दररोज फेसबुकचा वापर करतात. सर्वात अॅक्टिव्ह युजर्स कॅनडा आणि अमेरिकेचे आहेत. बघूया कोणते आहेत सिक्रेट फीचर्स. 

कोणी अनफ्रेंड केल्यास कसे जाणून घ्याल :

कोणी अनफ्रेंड केल्यास कसे जाणून घ्याल ? यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोरवरून एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्या अॅपचे नाव आहे  Who unfriended me. याचा वापर अतिशय सोपा आहे. याचा वापर करून तुम्हाला कोणी ब्लॉक केले किंवा अनफ्रेंड केले, हे तुम्ही पाहू शकता. 

प्रोफाईल पीक ठेवा सुरक्षित :

तुमचा प्रोफाईल पीक कोणीही डाऊनलोड करू शकतं. मात्र तुम्ही जर ते सुरक्षित ठेवलं तर तो पीक डाऊनलोड होणार नाही. यासाठी तुम्हाला एक सेटिंग करावी लागेल. प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. तिथे तुम्हाला Turn on Profile Picture Guard चे ऑप्शन दिसेल. ते ऑन करा. त्यामुळे तुमचा प्रोफाईल फोटो सुरक्षित होईल आणि कोणी तो डाऊनलोड करू शकणार नाही. 

कमेंट्स, टॅगिंग आणि लाईट्स डिलीट करणे :

तुम्ही जर चुकून एखाद्या पोस्टवर कमेंट. टॅग किंवा लाईक केले असेल तर तुम्ही ते डिलीट करू शकता. यासाठी तुम्हाला प्रोफाईलमध्ये जाऊन Activity log मध्ये जावे लागेल. त्यात तुम्हाला Fliter चे ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप केल्यास तुम्हाला लाईक किंवा कमेंट्स लिहिलेले दिसेल. त्यावर टॅप करा तुम्हाला डिलीटचा पर्याय मिळेल.