...असा असेल रिलायन्स जिओचा ५०० रुपयांचा स्मार्टफोन!

सध्या टेलिकॉम क्षेत्रातला सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय तो रिलायन्स जिओचा अवघ्या ५०० रुपयांचा स्मार्टफोन... फोर जी VoLTE तंत्रज्ञान असणारा आणि इतक्या किंमतीत उपलब्ध होणारा हा पहिलाच स्मार्टफोन असेल. 

Updated: Jul 11, 2017, 04:15 PM IST
...असा असेल रिलायन्स जिओचा ५०० रुपयांचा स्मार्टफोन! title=

मुंबई : सध्या टेलिकॉम क्षेत्रातला सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय तो रिलायन्स जिओचा अवघ्या ५०० रुपयांचा स्मार्टफोन... फोर जी VoLTE तंत्रज्ञान असणारा आणि इतक्या किंमतीत उपलब्ध होणारा हा पहिलाच स्मार्टफोन असेल. 

ऑगस्ट २०१७ पर्यंत हा स्मार्टफोन बाजारात दाखल होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पहिल्या टप्प्यात १० ते ११ लाख फोन्स बाजारात दाखल होऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या वार्षिक सभेत या स्मार्टफोनची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. 

रिलायन्सच्या या फोनमध्ये ५१२ एमबी रॅम असू शकतो. इंटरनल स्टोअरेज ४ जीबी आणि एस डी कार्डच्या साहाय्याने ही मेमरी वाढवण्याचा पर्याय यामध्ये दिला जाईल, असं सांगितलं जातंय. 

या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो. निअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) टेक्नोलॉजीसहीत असणाऱ्या या फोनमध्ये वाय-फायही उपलब्ध असेल.