IPhone 13 वर बंपर डिस्काउंट! 69,900 रुपयांचा फोन मिळतोय केवळ 22 हजार रुपयांत, कसा खरेदी कराल पाहा...

Apple iPhone 13 :  जर तुम्ही Apple iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण iPhone 13 खरेदी करणार्‍यांना सध्या खूप मोठी सूट देण्यात आली आहे. हा 69,900 रुपयांचा फोन केवळ 22 हजार रुपयांत मिळतय आहे. 

Updated: Jun 15, 2023, 02:01 PM IST
IPhone 13 वर बंपर डिस्काउंट! 69,900 रुपयांचा फोन मिळतोय केवळ 22 हजार रुपयांत, कसा खरेदी कराल पाहा... title=
iPhone 13 Available At Bumper Discount

Flipkart Big Saving Days Sale 2023 : आयफोन (Iphone) खरेदी करणे हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे स्वप्न असते. अशातच आता या फोन्सवर  कोणती ऑफर मिळतेय का, याची देखील आपण वाट बघत असतो. आता तुम्ही देखील अशांपैकीच एक असालतर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ऑनलाइन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक नवीनतम स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून Apple iPhone 13 फोनच्या 128 GB मॉडेलच्या खरेदीदारांना देखील 15 टक्के सूट देण्यात आली आहे. 

यासोबतच बँकिंग आणि एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे यूजर्स सर्वोत्तम iPhone 13 स्मार्टफोन खरेदी करू शकतात. तुम्हाला iPhone 13 फक्त 22 हजार रुपयांपर्यंत मिळू शकेल. हा फोन तुम्ही कसा खरेदी करु शकता ते जाणून घ्या...

नेमकी ऑफर काय?

iPhone 13 ची मूळ किंमत 69,900 रुपये असून याच फोनची किंमत 128 GB मॉडेल आहे. पण हा फोन फ्लिपकार्टवर 15 टक्के डिस्काउंटनंतर 58,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच iPhone 13 च्या 256 GB मॉडेलची किंमत 68,999 रुपये आहे. 

तसेच 512 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 88,999 रुपये असून दरम्यान, 128 जीबी मॉडेलचा विचार करता, त्यावर 15 टक्के सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत 58,999 रुपये असेल. त्यानंतर एक्सचेंज ऑफरमध्ये 35,000 रुपयांच्या किमतीचा सूट मिळू शकतो. पण एक्सचेंज ऑफरचा फायदा घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तुम्ही देत ​​असलेल्या जुन्या फोनची स्थिती जितकी चांगली असेल तितकी किंमत तुम्हाला चांगली मिळेल. तसेच किंमत फोनच्या मॉडेलवर अवलंबून असेल. तसेच, बँक ऑफरचा फायदा घेऊन, फोन फक्त 22 हजारांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो.

iphone 13 चे  फीचर्स

Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनमध्ये 12MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. एक फ्रंटल 12MP कॅमेरा देखील आहे. फोन A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो. या फोनमध्ये 12-मेगापिक्सेल लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जे 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये सेल्फीसाठी नाईट मोडसह 12-मेगापिक्सेल ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन पूर्ण चार्ज करूं 17 तास व्हिडिओ परताह आयी ऐसी कंपनी चे मत आहे.