गुगल पे युजर्सना धोक्याचा इशारा; 'हे' अ‍ॅप असेल तर आत्ताच डिलीट करा

Google Pay Users Alert: तुम्हीदेखील गुगल पे वापरता का? तर आत्ताच सावध व्हा. कारण गुगलकडून युजर्सना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे कारण जाणून घ्या.  

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 23, 2023, 11:10 AM IST
गुगल पे युजर्सना धोक्याचा इशारा; 'हे' अ‍ॅप असेल तर आत्ताच डिलीट करा title=
Google alerts to google pay users to not use screen sharing apps

Google Alert For Google Pay User: गुगल पेचा (Google Pay) वापर सध्या सर्रास केला जातो. अगदी छोट्या मोठ्या पेमेंटपासून ते मोठ्या व्यवहारांसाठीही गुगल पे केलं जाते. तुम्ही देखील डोळे बंद करुन गुगल पेचा वापर करत असाल तर आत्ताच सावध राहा. खरं तर गुगल पे भारतात खूपच लोकप्रिय आहे. तुम्ही देखील तुमच्या फोनमध्ये तुम्ही Google Pay अ‍ॅप डाउनलोड केले असेल आणि त्यामार्फत तुम्ही व्यवहार करत आहात. तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण हे एक अ‍ॅप जर तुम्ही डाउनलोड केले तर तुमचं बँक अकाउंट लगेचच खाली होईल. (Google Pay User)

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या (Screen Sharing App) मदतीने तुमचं बँक अकाउंट हॅकर्स लगेचच खाली होऊ शकते. स्क्रीन शेअरिंग अॅपच्या मदतीने एका फोनची स्क्रीन तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला शेअर करु शकता. म्हणजेच तुमच्या फोनच्या स्क्रीनवर काय चाललंय हे त्याला अगदी आरामात कळू सकते. साधारणतः स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपचा वापर फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपला रिमोटली फिक्स करण्यासाठी केला जातो. मात्र, अलीकडेच खुलासा झालेल्या एका दाव्यानुसार स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीने ऑनलाइन फ्रॉड केले जात असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या काळात Screen Share, AnyDesk आणि TeamViewer सारखे स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप खुप लोकप्रिय आहेत. 

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप का वापरु नयेत?

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्कॅंमर्स तुमचा डिव्हाइस कंट्रोल करु शकतात. तसंच, याच्या मदतीने तुमच्या एटीएम आणि डेबिट कार्डची माहिती अगदी आरामात मिळवू शकतात. त्याचबरोबर फोनमध्ये येणाऱ्या मेसेजमुळं किती पैशांची देवाण-घेवाण केली आहे तसंच, ओटीटीवरही नजर ठेवतात. 

अनइंस्टॉल करा अ‍ॅप

गुगलकडून एक अलर्ट करण्यात आला आहे. गुगल पे युजर्सना थर्ड पार्टी स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप डाउनलोड किंवा इन्स्टॉल करणे टाळले पाहिजे. जर तुम्ही गुगल पे डाउनलोड करण्याच्या आधी या अ‍ॅपचा वापर करत असाल तर स्क्रीन शेअर अ‍ॅप पूर्णपणे अनइन्स्टॉल झालेत का हे एकदा चेक करा. गुगलच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला हे अ‍ॅप डिलीट करायचे नसतील तरी सावध राहा. कारण या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही सायबर क्राइमचे शिकार होऊ शकतात.