दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन अशक्य....कारण गूगलनेही सांगितलं एवढे दिवस लागतील

कोरोनामुळे राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी काही विद्यार्थी आणि पालक करत 

Updated: Apr 9, 2021, 06:20 PM IST
दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन अशक्य....कारण गूगलनेही सांगितलं एवढे दिवस लागतील title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : कोरोनामुळे राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी काही विद्यार्थी आणि पालक करत आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने चाचपणीही केली. परीक्षा घेण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा तात्काळ उभारता येईल का? यासाठी शिक्षण विभागाने टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेस आणि गुगलकडे विचारणा केली होती. 

मात्र संपूर्ण राज्यभरात ऑनलाईन परीक्षेची यंत्रणा उभी करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकेल असं अभिप्राय या दोन्ही कंपन्यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे.

यावरुन तरी दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीवर आता विचार होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. ऑनलाईन दहावी-बारावीच्या परीक्षा घेणे हे तांत्रिक दृष्ट्या आताच शक्य नसल्याचं गूगलने देखील स्पष्ट केलं आहे.

दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी पालक आणि शिक्षकाकडून देखील होत आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक शिक्षकांनी देखील जीव गमावला आहे. तेव्हा प्रश्नपत्रिका वाटणे, उत्तर पत्रिका वाटणे, त्यावर सह्या करणे, आणि पुन्हा त्या परत घेऊन गठ्ठा बांधणे यात मोठ्या प्रमाणात संपर्क येणार आहे, आणि यात संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं जात आहे.