Google नाही, तर 'या' वेबसाईटला भेट देऊन सुंदर पिचई करतात दिवसाची भन्नाट सुरुवात

Google News : जो गुगल सर्व प्रश्नांची उत्तरं देतो त्याची मदत न घेता सुंदर पिचई कोणत्या वेबसाईटचा आधार घेतात माहितीये? पाहून घ्या, तुम्हालाही होईल मदत... 

सायली पाटील | Updated: Feb 22, 2024, 10:01 AM IST
Google नाही, तर 'या' वेबसाईटला भेट देऊन सुंदर पिचई करतात दिवसाची भन्नाट सुरुवात  title=
Google CEO Sundar Pichai starts his day by visiting this website

Google News : सकाळी उठल्यानंतर सहसा अनेक मंडळींचा दिनक्रम ठरलेला असतो. अमुक वेळी तमुक गोष्ट करायची, न्हाहारी आणि त्यानंतर दिवसभराच्या कामांची सुरुवात वगैरे वगैरे. या साऱ्यामध्ये झोपेतून जाग येताच मोबाईल हातात घेणारेही कमी नाहीत. अगदी जाग आल्या आल्या मोबाईलकडे पाहिलं नाही तरीही दिवसाच्या सुरुवातीला हा मोबाईल नकत आपल्या हातात दिसतोच. गुगलचे सीईओ, सुंदर पिचईसुद्धा यास अपवाद नाहीत. 

जगातील मोठ्या आणि प्रतिष्ठीत टेक कंपन्यांमधील एक असणाऱ्या Google च्या सीईओपदी असणारे सुंदर पिचईसुद्धा यास अपवाद नाहीत. त्यांच्या या सवयीनं आश्चर्याता धक्का बसायलाच नको, कारण तंत्रज्ञान आणि त्यात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगानं हा त्यांच्या कामाचाच भाग ठरतो. पण, इथं एक कमाल गोष्ट म्हणजे पिचई स्वत:ला Update ठेवण्यासाठी एक भन्नाट मार्ग अवलंबतात. ते त्यांना पडणाऱ्या प्रश्नांसाठी गुगलची नव्हे तर, दुसऱ्याच एका वेबसाईटची मदत घेतात. 

हेसुद्धा वाचा : टेन्शन वाढवणारी बातमी; जीव ओतून काम करूनही यंदा 'इतकीच' पगारवाढ

खुद्द CEO Sundar Pichai यांनीच एका मुलाखतीमध्ये याबाबतचा खुलासा केला. जिथं, त्यांनी आपण कोणतंही पुस्तक किंवा व्यायामानं दिवसाची सुरुवात करत असल्याचं स्पष्ट केलं. दिवसाची सुरुवात होताच आपण Techmeme या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व माहिती पुरवणाऱ्या पोर्टलला भेट देतो असं त्यांनी स्पष्ट केलं. इथंच पिचई यांना दिवसभरातील महत्त्वाच्या माहिती आणि संदर्भांवर आधारित विश्लेषण करण्याची संधीही मिळते. 

Techmeme नेमकं आहे तरी काय? 

Techmeme ही News Website 2005 मध्ये इंटेल इंजिनिअर Gabe Rivera यांनी सुरु केली. ज्यानंतर त्यांनी या वेबसाईटला इतकं मोठं केलं की, खुद्द सत्या नडेला आणि मार्क झुकरबर्गही तिथं दिल्या जाणाऱ्या माहितीचा आधार घेतात. 

टेकमीम या वेबसाईटला भेट देत या क्षेत्रातील सर्व घडामोडींचा आढावा घेणाऱ्या सुंदर पिचई यांनी आपला दिवस सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सुरु होतो असं सांगत बातमीपत्र वाचनालाही आपण प्राधान्य देतो असं यापूर्वीच्या मुलाखतीत सांगितलं होतं.