आता Debit Card ची गरज नाही, आधार कार्डने करा Google Pay, कसं ते जाणून घ्या...

Google Pay :  कोणतीही गोष्ट खरेदी करायची म्हटलं की आपण पेमेंट करताना गुगल पे चा वापर करतो. अशावेळी 5 रुपयांचा व्यवहार असो किंवा हजारोंचा खर्च आपण गुगल पे वरुन पेमेंट करतो. आता याच गुगल पे संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. 

Updated: Jun 8, 2023, 03:26 PM IST
आता Debit Card ची गरज नाही, आधार कार्डने करा Google Pay, कसं ते जाणून घ्या... title=
Google Pay

Google Pay Gets Aadhaar Card : आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीने करत असतो. अगदी भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यापासून ते मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये ऑनलाईन (Online Payment ) पद्धतीने पेमेंट स्वीकारत आहेत. त्यामुळे गुगल पे चा वापर जास्त प्रमाणात वाढत चालला  आहे. मात्र याच गुगल पे मध्ये काही मोठे बदल करण्यात आले असून आता आधार कार्ड नंबरच्या मदतीने तुम्ही गुगल पे वापरू शकता. त्यामुळे आता तुम्हाला डेबिट कार्डची गरज भासणार नाही.

अनेक लोक ऑनलाइन  UPI पेमेंट  वापरतात. विशेषतः UPI पेमेंट सेटिंग्जसाठी, डेबिट कार्डच्या माहितीची आवश्यकता असते. मात्र गुगल पे ने यामध्ये मोठे बदल केले असून डेबिट कार्डची गरज भासणार नाही. कारण आता तुम्ही आधार क्रमांकाच्या मदतीने तुम्ही Google Pay वापरू शकता आणि UPI पेमेंट देखील करु शकता. 

Google India ने UIDAI सोबत आधार क्रमांकाच्या मदतीने UPI ​​पेमेंटसाठी भागीदारी केली आहे. सध्या कोणतेही UPI पेमेंट अॅप अशी सुविधा देत नाही. कोणत्याही UPAI पेमेंट अॅपसाठी डेबिट कार्ड क्रमांक आणि पिन क्रमांक आवश्यक आहे. पण आधार क्रमांकाच्या मदतीने तुमचे काम खूप सोपे होणार आहे. 

आधार क्रमांकासह Google Pay वापरण्यासाठी, तुमचा मोबाइल नंबर बँक खात्याशी (Bank Account) आणि आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. गुगल पे सारखीच सुविधा सध्या काही बँकांसाठी उपलब्ध आहे. पण लवकरच ते सर्व बँकांसाठी जारी केले जाणार आहे.

तसेच सेटिंग्ज करण्यासाठी सर्वात आधी Play Store किंवा Apple च्या App Store वरून Google Pay अॅप डाउनलोड करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. तेथे तुम्हाला डेबिट कार्ड व्यतिरिक्त आधार क्रमांकाचा पर्यायी दिसेल. आता आधारच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटीपी मिळाल्यानंतर त्यात क्रमांक टाका आणि पुढील प्रक्रिया करा.

OTP एंटर केल्यानंतर, तुम्हाला Google Pay अॅपसाठी उपलब्ध असलेल्या पिन क्रमांकासाठी सूचित केले जाईल. कारण जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करता आणि पेमेंटसाठी Google Pay वापरता तेव्हा तुम्हाला सहा अंकी पिन वापरण्यास विचारले जाईल. त्यानंतर तुम्हाला त्यात सहा अंकी पिन त्यामध्ये एंटर करणे आवश्यक आहे. कारण पिन टाकल्यानंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडला जातो. मग तुम्हाला Google Pay वर दिसेल आणि तुम्ही तुमचा दैनंदिन व्यवसाय करू शकता किंवा अॅप वापरू शकता.