पुरुष Google वर सर्वात जास्त काय Search करतात? अहवालात धक्कादायक खुलासा

Google  चा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये मुलं आणि पुरुष Google  वर सर्वात जास्त काय Search करतात? हे सांगण्यात आलं आहे.

Updated: Jun 13, 2022, 06:17 PM IST
पुरुष  Google वर सर्वात जास्त काय Search करतात? अहवालात धक्कादायक खुलासा title=

मुंबई : Google हा एक असा व्यासपीठ आहे. जेथे लोकांना त्यांच्या सर्वप्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणूनच तर लोकांना त्यांच्या आयुष्यात कोणताही प्रश्न पडला, तर ते Google वर सर्च करतात. इतकंच काय तर Google वर लोकं बरेच कोर्सेस वैगरे करतात. ज्याचा त्यांना भविष्यात फायदा होतो. लहान मुलांसापून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं ही Google कडे असतात.  असे असलं तरी तुम्ही ज्यागोष्टी गुगुलवर सर्च करता त्यागोष्टी गुगुलच्या सर्च हिस्ट्रीच्या इतिहासात जतन केली जातात. ज्याचा वापर नंतर गुगल रिसर्चसाठी वापतो आणि आपल्या ग्राहकांना चांगला एक्सपिरिएन्स देण्यासाठी वापतो. तसेच इतर अनेक रिसर्चसाठी तो या हिस्ट्रीचा वापर करतो.

Google  चा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये मुलं आणि पुरुष Google  वर सर्वात जास्त काय Search करतात? हे सांगण्यात आलं आहे. चला तर आपण ते जाणून घेऊ या.

'फ्रॉम-मार्स डॉट कॉम'च्या रिपोर्टनुसार, पुरुष गुगलवर सर्वात जास्त शोधतात ती त्यांची लैंगिकतेबद्दल.

अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 68 हजार पुरुष सर्च करतात की, ते नपुंसक तर नाहीत ना. यासोबतच मुलं गुगलला हेही विचारतात की दाढी केल्याने दाढीचे केस जास्त वाढतात की नाही आणि दाढी दाड करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचे केस जास्त प्रमाणात येण्यासाठी ते कोणता उपाय करु शकतात.

या शिवाय मुलं असं ही गुगलवर सर्च करतात की, पोनीटेल बनवल्याने किंवा टोपी घातल्याने त्यांचे केस कमी होऊ शकतात का? किंवा त्याचा केसांवर कसा परिणाम होईल.

तसेच वर्कआउट रूटीन, बॉडी-बिल्डिंग कसे करावे आणि कोणते प्रोटीन शेक प्यावे, या सर्वांचाही मुलं गुगलवर सर्च करतात.

या अहवालात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अहवालानुसार, पुरुषांच्या टॉप गुगल सर्चमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्य आहे, परंतु मुलांना हे जाणून घ्यायचे आहे की, मुलांनाही स्तनाचा कर्करोग होतो की नाही; आणि तसे असल्यास, हे कशामुळे उद्भवतं? हे जाणून घेण्यासाठी देखील ते जास्त उत्सूक असतात.

मुलींबद्दल मुलांना या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात

मुलांना स्वत:बद्दलंच नाही, तर मुलींबद्दल देखील अनेक प्रश्न पडत असतात. जे जाणून घेण्यासाठी ते गुगलवर सर्च करतात. या अहवालानुसार, मुले गुगलवर सर्च करतात की, मुलींना कसे प्रभावित केले जाऊ शकते? त्या कशा आनंदी राहू शकतात? आणि त्यांना काय आवडते आणि काय आवडत नाही. मुली लग्नानंतर काय करतात हे देखील मुलं गुगलवरुन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.