हार्ले डेविडसनच्या चार शानदार बाईक लॉन्च

 इंटरनॅशनल लॉन्चनंतर साधारण एक महिन्यानंतर हार्ले डेविडसन या जगप्रसिद्ध कंपनीने आपल्या ४ नवीन बाईक्स भारतात लॉन्च केल्या आहेत.

Updated: Oct 12, 2017, 04:34 PM IST
हार्ले डेविडसनच्या चार शानदार बाईक लॉन्च

नवी दिल्ली : इंटरनॅशनल लॉन्चनंतर साधारण एक महिन्यानंतर हार्ले डेविडसन या जगप्रसिद्ध कंपनीने आपल्या ४ नवीन बाईक्स भारतात लॉन्च केल्या आहेत.

हार्ले डेविडसनने दी स्ट्रीट बॉब, फॅट बॉब, फॅट बॉय आणि दी हेरिटेज क्लासिक नावाने चार शानदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत. या सर्वच बाईक नव्या फ्रेम आणि नव्या मिलवाउकी ८ इंजिनसोबत लॉन्च करण्यात आल्या आहेत. 

दी हेरिटेज क्लासिक -

२०१८ मॉडलची हार्ले डेविडसनच्या या बाईकची किंमत दिल्ली एक्स शोरूममध्ये १८.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. या बाईकला नवीन १०७ मिलवाउकी ८ इंजिन देण्यात आलंय. सध्याच्या मॉडलच्या तुलनेत ही बाईक १० टक्के अधिक वेगवान होईल. 

फॅट बॉब -

दमदार लुक्स आणि बोल्ड अपील असलेली या बाईकमध्ये १७४५ सीसीचं ८ व्हॉल्व मिलवाउकी ८, ऑईल कूल्ड इंजिन देण्यात आलंय. व्ही ट्विन मोटर असलेली ही बाईक ३००० आरपीएम वर १४५ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. ही फॅट बॉब बाईक रि-डिझाईन स्टील ट्यूबलर फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत ही बाईक ६५ टक्के जास्त मजबूत झाली आहे. या बाईकची किंमत १३.९९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. 

स्ट्रीट बॉब -

कंपनीचा दावा आहे की, या बाईकचं वजन आधीच्या तुलनेत साधारण ८ टक्के कमी आहे. राईड क्वालिटी तर आहेच, सोबतच डिझाईनमध्ये आधीपेक्षा छोटी टॅंक दिली आहे. दिल्लीच्या एक्स शोरूमची किंमत ११.९९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आलीये. 

फॅट बॉय -

स्क्वॅरिश क्रोम एलईडी हेडलॅम्प्स आणि सॉलिड बिल्ट अ‍ॅल्यूमिनियम व्हिल्ससोबत येणा-या या बाईकची किंमत दिल्लीच्या एक्स शोरूममध्ये १७.४९ लाख रूपये इतकी आहे. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close