व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कसं खरेदी कराल Fastag? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Fastag Online Apply: फास्टॅग घ्यायचंय पण कसं? असा विचार करताय तर आत्ताच याटी संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खरेदी करा फास्टॅग 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 10, 2024, 04:52 PM IST
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कसं खरेदी कराल Fastag? वाचा संपूर्ण प्रक्रिया  title=
how to buy fastag online from whatsapp follow these steps

Fastag Online Apply: पेटीएम पेमेंट बँकवर रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर फास्टॅग रिचार्ज करणे अवघड होऊन बसले आहे. पण तुम्हाला माहितीये का ऑनलाइन व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही फास्टेग खरेदी करु शकता. ही प्रक्रिया खूपच सोप्पी आहे. त्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. या माध्यमातून फास्टॅग तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचेल. जे तुम्ही तुमच्या वाहनावर लावून आरामात प्रवास करु शकता. 

फास्टॅग काय आहे?

FASTag हे एक टूल असून ते तुमच्या प्रीपेड अकाउंटसोबत लिंक आहे. यातील रेडिओ फ्रीक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. फास्टॅग तुमच्या वाहनावर किंवा विंडस्क्रीनवर लावले जाते. ज्यामुळं टोलवर ऑनलाइन पैसे कापले जातात. फास्टॅगमधून टोल चार्ज आपोआप कापले जातात. यामुळं टोलबुथवर तुमचा वेळ वाया जात नाही. एकदा खरेदी केल्यानंतर FASTag 5 वर्षांपर्यंत वैध राहतात. मात्र फास्टॅग खरेदी केल्यानंतर नेहमी रिचार्ज करत राहावे लागते. 

व्हॉट्सअॅपवरुन कसा खरेदी कराल फास्टॅग

- तुम्ही  ICIC बँकेच्या इनोव्हेटिव WhatsApp बँकिगच्या माध्यमातून फास्टॅगसाठी ऑनलाइन अर्ज करु शकता. 

- सगळ्यात पहिले तुम्हाला '8640086400' या क्रमांकाला कॉन्टेक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावे लागणार आहे. 

- त्यानंतर '8640086400' व्हॉट्सअॅप नंबरवर Hi लिहून पाठवा 

- त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील. 

- आयसीआयसीआय फास्टॅग  सेवांसाठी 3 टाइप करा

- नवी टॅगसाठी पुन्हा एकदा 3 टाइप करा

- तुम्हाला ICICI बँकच्या  FASTag अॅप्लिकेशन पेजवर एक लिंक मिळेल

- त्यानंतर त्यावर महत्त्वाची माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील 

- एकदा पेमेंट झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर  FASTag येईल.