तुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल?

आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 25, 2017, 09:22 AM IST
तुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल? title=

मुंबई :  इंटरनेट हा आपल्या जीवनाचा भाग झाला आहे. त्यामुळे इंटरने माहित नाही असा मनुष्य मिळणे ही अपवादात्मक गोष्ट. आपल्यापैकी सर्वाधीक लोक इंटरनेटचा वापर करतात. ही गरज पूर्ण करण्यास मदतीला येते जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल. पण, तुम्हाला माहिती आहे का, इंटरनेटवरील तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची बारीक नजर असते. इतकी की, तुमच्या लोकेशनपासून ते थेट तुम्ही इंटरनेटवर काय पाहिले या हिस्ट्रीपर्यंत. त्यामुळे आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....

अकाऊंट डिलीट करणे सोपे नाही, त्यासाठी पद्धत महत्त्वाची

आपण कधी आपले ऑनलाईन अकाऊंट डिलीट करण्याचा प्रयत्न केला आहे काय? खरे तर ऑनलाईन अकाऊंट डीडिट करणे वाटते तितके सोपे नाही. अनेकदा ऑनलाईन सर्व्हिस देणारे अकाऊंट आपण केवळ 'डिसेबल'करू शकता. किंवा काही मर्यादित काळासाठी ते बंद करू शकता. जे मर्यादा संपल्यानंतर पुन्हा सुरू करता येतात. तुम्हाला जर तुमचे गुगल अकाऊंट डिलीट करायचे असेल तर, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. म्हणूनच जाणून घ्या गुगल अकाऊंट डिलीट करण्याची पद्धत....

असे करा गुगल अकाऊंट डिलीट

सर्वात प्रथम तुमच्या accounts.google.com वर जा. तिथे सेटींग्जमध्ये जाऊन तुम्ही तुमची डिटेल्स टाका. पुढे अकाऊंट प्रेपरन्सवर जाऊन डिलीट यूवर अकाऊंट सर्व्हिसवर जा. नेक्स्ट स्क्रीन वर डिलीट गूगल अकाऊंट अॅण्ड डेटा सिलेक्ट करा. गुगल आपल्याला आपले युजरनेम विचारेन. ते दिल्यावर तुम्हाला एक डिलेशन कन्फर्म करण्यासाठी एक मेल येईल. तुम्हाला मेल येताच त्यातील लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक करताच तुमची प्रोसेस पूर्ण झाली असे समजा.

पुन्हा तेच अकाऊंट सुरू करता येते..

दरम्यान, तुमचा निर्णय यबदलला आणि तुम्ही तुमचे तेच अकाऊंट (जे डिलीट केले आहे) सुरू करू इच्छित असाल तर, तुम्ही ते करू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला जलद हालचाली कराव्या लागतील. त्यासाठी accounts.google.com/signin/recovery वर जा आणि आपला जुना ईमेल आयडी टाका. तुमचे अकाऊंट रिकव्हर होत असेल तर, गुगल तुम्हाला लगेच प्रतिसाद देईल. अन्यथा, हे शक्य नाही, म्हणून गुगल तुम्हाला मेल करेल.