ह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग

ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.

Updated: Nov 4, 2017, 04:07 PM IST
ह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग title=

नवी दिल्‍ली : ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.

कंपनीने ही कार २२ ऑगस्टला भारतात लॉन्च केली होती. तेव्हापासूनच या कारची डिमांड वाढलेली आहे. कंपनीकडून मिळालेल्या ताजे आकडेवारीनुसार, कारने २० हजार बुकिंगचा आकडा पार केलाय.  

कंपनीनुसार, प्रत्येक महिन्यात ५ ते ६ हजार व्हर्ना कारची विक्री होत आहे. ज्यात ४५ टक्के विक्री टॉप व्हेरिएंटची होत आहे. तेच विक्रीत २५ टक्के भाग ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट असलेल्या व्हर्नाचा आहे. लॉन्चिंगवेळी कंपनीने नवीन व्हर्नाला ७.९९ लाख रूपयांमध्ये लॉन्च केले होते. तेच या कारचं टॉप व्हेरिएंट १२.३९ लाख रूपयांना उपलब्ध आहे. किंमतीनुसार ही कार बाजारात सध्या मारूती सुझुकी सियाझ, फॉक्सवॅगन वेंटोला जोरदार टक्कर देत आहे. 

सेडान कार असूनही कंपनीने या कारला जास्त मायलेज असल्याचा दावा केलाय. कंपनीनुसार पेट्रोल इंजिनसोबत व्हर्ना १७.७० किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देत आहे. तेच डिझल इंजिन कार २४.७५ किमी प्रति लीटर मायलेज देत आहे. ह्युंदाईची ही कार केवळ भारतातच नाहीतर भारताबाहेरही लोकप्रिय आहे.