IBMचा जगातला सगळ्यात लहान कॉम्प्यूटर, किंमत फक्त ७ रुपये

आयबीएम या कंपनीनं जगातला सगळ्यात छोटा कॉम्प्यूटर बनवण्याचा दावा केला आहे.

Updated: Mar 21, 2018, 10:46 PM IST
IBMचा जगातला सगळ्यात लहान कॉम्प्यूटर, किंमत फक्त ७ रुपये  title=

मुंबई : आयबीएम या कंपनीनं जगातला सगळ्यात छोटा कॉम्प्यूटर बनवण्याचा दावा केला आहे. कंपनीनं एका प्रोग्रॅममध्ये या मायक्रो कॉम्प्यूटरला जगासमोर आणलं. हा कॉम्प्यूटर एक अॅण्टी फ्रॉड डिव्हाईस असून डिजीटल फिंगरप्रिंटपासून रोजच्या वस्तूंना एम्बेड केलं जाऊ शकतं.

या डिव्हाईसमध्ये एक चिप लावण्यात आलेली आहे. या कॉम्प्यूटरच्या आतमध्ये प्रोसेसर, मेमरी आणि स्टोरेज देण्यात आलं आहे. पुढच्या ५ वर्षांमध्ये हा कॉम्प्यूटर बाजारात येईल, तसंच याची किंमत फक्त ७ रुपये असेल, असं कंपनीनं सांगतिलं आहे.

हा कॉम्प्यूटर म्हणजे एक अॅण्टी फ्रॉड डिव्हाईस आहे. यामुळे वस्तूंवर वॉटरमार्क लावण्यात येईल यामुळे चोरी आणि फसवणूक कमी होईल. या कॉम्प्यूटरला क्रिप्टो अँकर प्रोग्रामपासून तयार करण्यात आलं आहे. वस्तू कंपनीतून निघाल्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचोपर्यंत त्याच्याशी छेडछाड झालेली असते. तसंच अनेक वेळा वस्तूंचा काळा बाजारही केला जातो. या कॉम्प्यूटरमुळे अशा गोष्टी रोखण्यास मदत होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

१ लाख ट्रांजिस्टर

आयबीएमच्या या कॉम्प्यूटरमध्ये छोटी रेंडम अॅक्सेस मेमरी, एलईडी, फोटो डिटेक्टर, फोटोवेल्टिक सेल आणि १ लाख ट्रांजिस्टर आहेत. एवढा स्वस्त आणि छोटा असलेला हा कॉम्प्यूटर कुठेही ठेवता येऊ शकतो.