आयडियाचा जबरदस्त प्लॅन ; मिळणार इतके कॅशबॅक

टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स सादर करतात.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Mar 6, 2018, 08:03 AM IST
आयडियाचा जबरदस्त प्लॅन ; मिळणार इतके कॅशबॅक title=

नवी दिल्ली :  टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स सादर करतात. जिओने सर्वात आधी फुटबॉल ऑफर सादर केली होती. यानंतर एअरटेल आणि आयडियाने दिखील युजर्ससाठी कॅशबॅक ऑफर सादर केली आहे.

काय आहे आयडियाची ऑफर?

जिओ आणि एअरटेलनंतर आयडियाने देखील सर्व नव्या 4G हॅडसेटवर मेगा कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. ही ऑफर जिओच्या फुटबॉल ऑफरला नक्कीच टक्कर देईल. या ऑफरसाठी आयडियाने अनेक स्मार्टफोन कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. कंपनीची ही ऑफर प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे आणि ३० एप्रिलपर्यंत सुरू राहील. ऑफरच्या काळात खरेदी केलेल्या 4G स्मार्टफोनवर आयडियाकडून २०० रुपयांचा  कॅशबॅक मिळेल.

कॅशबॅकसाठी काय करावे लागेल?

कॅशबॅक मिळवण्यासाठी युजर्सना प्रत्येक महिन्याला १९९ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. यानंतर युजर्सना कॅशबॅक मिळेल. १९९ रुपयांव्यतिरिक्त ३९८, ४४९ आणि ५०९ रुपयांचे रिचार्ज करु शकतात.
युजर्संना २००० रुपयांचे कॅशबॅक टप्प्यात मिळेल. म्हणजे पहिले १८ महिने कमीत कमी ३००० रुपयांचे रिचार्ज केल्यावर युजर्संना ७५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.बाकीच्या १२५० रुपयांचा कॅशबॅक मिळण्यासाठी युजर्संना १८ महिन्यात कमीत कमी ३००० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.आयडियाच्या पोस्टपेड युजर्सला कॅशबॅकचा फायदा घेण्यासाठी ३८९ रुपयांचे रिचार्ज करायला हवे.यापूर्वी रिलायन्स जिओने नव्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर सादर केली होती. यात कंपनी युजर्सना २,२०० रुपयांचा कॅशबॅक देत होती. जिओच्या या ऑफरचे नाव आहे फुटबॉल ऑफर.

काय आहे फुटबॉल ऑफर ?

जिओच्या फुटबॉल ऑफरच्या अंतर्गत कंपनी २२ स्मार्टफोन कंपन्यांसाठी प्रोडक्टवर कॅशबॅक ऑफर देत होती. या कॅशबॅकच्या अंतर्गत नवीन स्मार्टफोन्सवर जिओचे सब्सक्रिप्शन घेण्यासाठी युजर्संना २,२०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

या कंपन्यांवर मिळेल ऑफर?

जिओची फुटबॉल ऑफर सॅमसंग, शाओमी, आसुस, एलकाटेल, मोटरोला, पॅनासॉनिक, हुवावे, नोकीया, एलजी, मायक्रोमॅक्स, ब्लकबेरी, एलवायएफ, इंटेक्स, जिवी, कॉमिओ, स्वाईप, जेन, जिओक्स, आयवूमी, सेंट्रीक यांसारख्या स्मार्टफोन कंपन्यांवर मिळेल.