...ही बनणार देशातील सर्वात मोठी 'टेलिकॉम ऑपरेटर' कंपनी

याच्या ग्राहकांची संख्या जवळपास ४३ कोटी इतकी होईल

Updated: Jul 10, 2018, 04:08 PM IST
...ही बनणार देशातील सर्वात मोठी 'टेलिकॉम ऑपरेटर' कंपनी title=

मुंबई : आयडिया आणि व्होडाफोनच्या एकत्रीकरणाला दूरसंचार मंत्रालयाकडून सशर्त मंजुरी मिळालीय. 'व्होडाफोन - आयडिया लिमिटेड' असं या नव्या कंपनीचं नाव असणार आहे. यासोबतच ही कंपनी देशातील सर्वात मोठी 'टेलिकॉम ऑपरेटर' बनणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, 'आयडिया सेल्युलर'ला यासाठी व्होडाफोनला स्पेक्ट्रमसाठी ३,९२६ करोड रुपये देणं अपेक्षित आहे. सोबतच ३३४२ करोड रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्याची अटही ठेवण्यात आलीय. 

या नव्या कंपनीची बाजारातील भागीदारी ३५ टक्के होईल आणि याच्या ग्राहकांची संख्या जवळपास ४३ कोटी इतकी होईल. 

मात्र यासाठी कंपनीला काही अटींचं पालन करावं लागणार आहे. कंपनीला शेअर होल्डर्सची मंजुरी घ्यावी लागेल तसंच आयडिया सेक्युलरला व्होडाफोनच्या स्पेक्ट्रमसाठी ३ हजार ९२६ कोटी रुपये रोख भरावे लागतील शिवाय ३ हजार ३४२ कोटींची बँक गँरंडी जमा करावी लागणार आहे..